कोल्हापूर : चिमुकल्यांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटीलअंबाबाई चरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:43 PM2018-06-12T15:43:17+5:302018-06-12T15:43:17+5:30
आर्थिक परिस्थितीमुळे हृदयरोगाशी संबंधित कठीण शस्त्रक्रिया करणे अशक्य असणाऱ्या मुलांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. या चिमुकल्यांना घेऊन पालकमंत्र्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
कोल्हापूर : आर्थिक परिस्थितीमुळे हृदयरोगाशी संबंधित कठीण शस्त्रक्रिया करणे अशक्य असणाऱ्या मुलांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. या चिमुकल्यांना घेऊन पालकमंत्र्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासह बालक व पालकांनी अंबाबाई चरणी ओटी अर्पण केली.
काही महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोगाशी संबंधित ० ते १८ वयोगटांतील मुलांचे २-डी ईको व हृदयरोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. शिबिरामध्ये २८८ बालकांचे २-डी ईको करण्यात आले होते. यामधील सदोष ५८ पैकी २६ बालकांवर मुंबई व कोल्हापूर येथे पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.
गरजू रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी कावळा नाका विश्रामगृह येथे स्वतंत्ररित्या पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यरत आहे. हा कक्ष गरजूंना सर्वतोपरी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कार्यरत असल्याने या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
यावेळी ‘पणन’चे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, संदीप देसाई, आरोग्य समन्वयक अनिकेत मोरबाळे, धनाजी जाधव आदी उपस्थित होते.