कोल्हापूर : गुटखा विक्री करणाऱ्यास अटक, ५० हजार किमतीचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:34 PM2018-10-10T12:34:53+5:302018-10-10T12:38:11+5:30
सीपीआर चौक ते पंचगंगा नदीघाट परिसरात गुटखा विक्री करताना लक्ष्मीपुरी पोलिसांनी एका तरुणास मंगळवारी दुपारी अटक केली. संशयित रितेश धोंडीराम रोटे (वय ३०, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या घरातून ५० हजार किमतीचा गुटखा जप्त केला.
कोल्हापूर : सीपीआर चौक ते पंचगंगा नदीघाट परिसरात गुटखा विक्री करताना लक्ष्मीपुरी पोलिसांनी एका तरुणास मंगळवारी दुपारी अटक केली. संशयित रितेश धोंडीराम रोटे (वय ३०, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या घरातून ५० हजार किमतीचा गुटखा जप्त केला.
अधिक माहिती अशी, जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने महाराष्ट्रामध्ये गुटखा व सुगंधित सुपारी यांची विक्री व साठा करण्यास बंदी घातली आहे; परंतु शहरामध्ये काही लोक जवळच्या कर्नाटक राज्यातून गुटखा आणून त्याची विक्री करीत असल्याच्या तक्रारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडे आल्या होत्या.
त्यांनी सहायक फौजदार सर्जेराव चौगले यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रितेश रोटे हा कर्नाटकातून गुटखा आणून शहरात विकत असल्याची माहिती मिळाली.
मंगळवारी तो सीपीआर चौक ते पंचगंगा घाट परिसरात दुचाकीवरुन विक्री करणार असल्याचे समजताच पाळत ठेवून त्याला पकडले. त्याची मोपेड (एमएच ०९ ई. सी. १४५६) व माल जप्त करून घरातून गुटख्याचा साठाही जप्त केला.