कोल्हापूर : दीड लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू पकडला; दोघे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:38 PM2018-08-25T12:38:44+5:302018-08-25T12:43:32+5:30
कार व रिक्षामधून वितरित करण्यात येत असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू घेऊन जाणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. संशयित राजदीप मनोहर लठ्ठे (वय ४०, रा. कदमवाडी) व अमर मधुकर मधाळे ( ४६, रा. टेंबलाईवाडी)अशी त्यांची नावे आहेत.
कोल्हापूर : कार व रिक्षामधून वितरित करण्यात येत असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू घेऊन जाणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. संशयित राजदीप मनोहर लठ्ठे (वय ४०, रा. कदमवाडी) व अमर मधुकर मधाळे ( ४६, रा. टेंबलाईवाडी)अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी ही कारवाई लिशा हॉटेल चौक, पाटोळेवाडी येथे केली. संशयितांकडून गुटखा, सुगंधी तंबाखू, एक लाख ५२ हजार रुपये, कार आणि रिक्षा यांची किंमत चार लाख रुपये असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोेलिसांनी जप्त केला.|
पोलिसांनी सांगितले की, पाटोळेवाडी परिसरात कार व रिक्षामधून शहरामध्ये गुटखा व सुगंधी तंबाखू वितरित करण्यासाठी संशयित राजदीप लठ्ठे व अमर मधाळे हे दोघेजण जात होते.
घटनास्थळी पोलिसांनी अन्न, औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी केदार व आर. पी. पाटील यांना बोलावून घेतले. जप्त केलेला गुटखा व सुगंधी तंबाखू, इत्यादी मालमत्ता पुढील कारवाईसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील, सहायक फौजदार गेंजगे, पोलीस हवालदार तानाजी चौगुले, पोलीस नाईक शिवाजी पाटील, सचिन पाटील, चौधरी, बामणीकर, कांबळे यांनी केली.