कोल्हापूर, हातकणंगलेत प्रचार शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:57 AM2019-04-22T00:57:46+5:302019-04-22T00:57:52+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. ...

Kolhapur, Hathkangale propaganda cool down | कोल्हापूर, हातकणंगलेत प्रचार शांत

कोल्हापूर, हातकणंगलेत प्रचार शांत

Next

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. अखेरच्या दिवशी गाठीभेटी, प्रचार रॅली, पदयात्रा व सभांचा मेळ घालताना उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसले. जाहीर प्रचार थांबला असला तरी अंतर्गत जोडण्या मात्र वेगावल्या आहेत. दोन्ही मतदारसंघांत बहुरंगी लढत होत असली तरी खरा सामना राष्टÑवादी आघाडी व शिवसेनेतच होत आहे. जिल्हा प्रशासनाने मतदान यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीतीलराष्टÑवादी आघाडीचे धनंजय महाडिक व शिवसेना-भाजप युतीचे संजय मंडलिक या मल्लांतच या वेळेला सरळ लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अरुणा माळी यांनीही प्रचारयंत्रणा नेटाने राबविली आहे. हातकणंगलेमध्ये आघाडीचे राजू शेट्टी व युतीचे धैर्यशील माने यांच्यात काट्याची टक्कर पाहावयास मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद यांनीही हवा केली आहे.
लोकसभेची निवडणूक असल्याने भाजप-शिवसेना सरकारच्या कारभारावर टीकाटिप्पणी झाली; पण उमेदवारांचा खरा प्रचार व्यक्तिगत टीकेवरच राहिला. स्थानिक निवडणुकीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप झाले. कोल्हापूर मतदारसंघात ‘गोकुळ’ हाच शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला; तर हातकणंगलेमध्ये गेल्या दहा वर्षांतील विकास आणि शेतकरी संघटनेची आंदोलने प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिली.
निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी सहा वाजता संपला. प्रचार रॅली, पदयात्रा, गाठीभेटी, बैठका, सभांचा धडाका शेवटच्या टप्प्यात राहिला. शेवटचे आठ-दहा तास मिळणार असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची प्रचार यंत्रणा राबविताना दमछाक उडाली. जाहीर प्रचार संपला असला तरी छुप्या जोडण्या वेगावल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात फोडाफोडीसह इतर आमिषे दाखविली जात आहेत.
--------------
मतदान केंद्र व मतदार संख्या : कोल्हापूर
विधानसभा मतदारसंघ केंद्रे मतदार
चंदगड ३७६ ३,१९,१४३
राधानगरी ४२३ ३,२६,३०८
कागल ३५१ ३,२१,२८४
कोल्हापूर दक्षिण ३२२ ३,२२,१८०
करवीर ३५१ ३,०२,०३२
कोल्हापूर उत्तर ३०९ २,८३,३९८
————————————————————-
एकूण २१३२ १८,७४,३४५
——————————————————————————-
मतदान केंद्र व मतदार संख्या : हातकणंगले
विधानसभा मतदारसंघ केंद्रे मतदार
शाहूवाडी ३३२ २,८७,२९८
हातकणंगले ३३० ३,१९,७१६
इचलकरंजी २६७ २,९२,९८०
शिरोळ ३०१ ३,१२,४९५
शिराळा ३३४ २,६९,२९५
इस्लामपूर २९२ २,९०,७७९
———————————————————————
एकूण १८५६ १७,७२,५६३
——————————————————————
यांची लागली प्रतिष्ठा पणास -
कोल्हापूर मतदारसंघ
राष्ट्रवादी आघाडी : धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, बजरंग देसाई, भरमूअण्णा पाटील, अरुण नरके, आर. के. पोवार.
शिवसेना युती : संजय मंडलिक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, संजय पवार, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, विजय देवणे, संजय घाटगे, संग्राम कुपेकर, राजेश पाटील, दिनकरराव जाधव.
हातकणंगले मतदारसंघ
स्वाभिमानी आघाडी : राजू शेट्टी, जयंत पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, विनय कोरे, मानसिंगराव गायकवाड, मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील.
शिवसेना युती : धैर्यशील माने, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील, शिवाजीराव नाईक, उल्हास पाटील, माधवराव घाटगे.

Web Title: Kolhapur, Hathkangale propaganda cool down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.