कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा जागा शिवसेनेकडेच, मात्र... ; मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं
By समीर देशपांडे | Published: January 2, 2024 02:36 PM2024-01-02T14:36:16+5:302024-01-02T14:37:36+5:30
'मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये'
कोल्हापूर : हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभेचे दोन्ही विद्यमान खासदार आमच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे या दोन्ही जागा आमच्याकडेच राहतील. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ते शिवसंकल्प अभियान तयारीच्या बैठकीसाठी येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. २०१९ साली आम्ही जिंकलेल्या १३ जागांवर आमचा दावा आहे असेही ते म्हणाले.
सामंत म्हणाले, सिंधुदुर्गच्या लोकसभा जागेवरही आमचा दावा आहे. मात्र याबाबतही अंतिम निर्णय मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रितपणे घेतील. आता निवडणुकीबाबत काहीही असु देत सगळे सर्व्हे उलटे होतील. मराठा आरक्षण प्रश्नी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेण्यात येणार आहे.
'मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये'
कोरोना काळात पीपीई किटमधे भ्रष्टाचार करणाऱ्यांनी, मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये असा टोला यावेळी ठाकरे गटाच्या आरोपांवर सामंत यांनी लगावला. अनेकांना जो बायडन हाेण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यांनी स्वप्नं पहात रहावं असा टोला सामंत यांनी संजय राऊत यांना लगावला.