कोल्हापूरचा आरोग्य विभाग राज्यात ठरला अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 04:32 PM2022-01-31T16:32:31+5:302022-01-31T16:32:59+5:30
आरोग्य विभागाने अठरा वर्षांच्या आतील बालकांवर विविध शस्त्रक्रिया करून दिली रोगापासून मुक्ती
संदीप आडनाईक
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कोल्हापूरच्याआरोग्य विभागाने अठरा वर्षांच्या आतील बालकांवर विविध शस्त्रक्रिया करून त्यांना रोगापासून मुक्ती दिल्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा रुग्णालय, कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रासह ४२ पथकांतील विविध आरोग्य केंद्रांतील १६८ जणांनी प्रयत्न केले आहेत.
वार्षिक तपासणीत आढळलेल्या विविध आजारांचे रोगनिदान केल्यानंतर या कार्यक्रमांतर्गत डिसेंबर २०२१ अखेर जिल्ह्यातील ३,४६,७४८ बालकांवर विविध आजारांतर्गत उपचार केले. त्यातील १३२२ मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. यात २०१ अस्थिव्यंग, २०४ दंतोपचार, तर तब्बल १२० हृदय शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ३८,०६६ बालकांवर जागेवर उपचार केले आहेत.
यांंनी घेतला पुढाकार : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, बालरोगतज्ज्ञ डॉ. एल. एस. पाटील, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. दिलीप वाडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर, प्रभारी शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, कार्यक्रम पर्यवेक्षक प्रज्ञा संकपाळ, शीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या व्यवस्थापक मनोरमा सुंजी, श्रवण व वाचादोष तज्ज्ञ गणेश देशमुख, सहायक सतीश केळूसकर, प्रियंका कांबळे.
विविध आजारांवर झालेल्या शस्त्रक्रिया : १३२२, अस्थिव्यंग : २०१, अन्डिसेन्डेड टेस्टिस : ३१, हायड्रोसिल : २५, हर्निया : ६४, अपेंडिक्स : ७०, मूळव्याध : ४, टाळूभंग : ३०, तिरळेपणा : ५०, दंतोपचार : २०४, कान-नाक-घसा :३७ (कॉक्लिअर इम्प्लॉन्ट : ९), कॅन्सर : २, किडनी : १२, न्यूरल ट्यूब डिफेक्ट : ८, इतर : ५८४, हृदयशस्त्रक्रिया :१२०, सहभागी शाळा : १४६६, एकूण विद्यार्थी : २,१४,३९२, अंगणवाडी : (प्राथमिक फेरी) : १,१५,८४७, अंगणवाडी (दुसरी फेरी) : १,३२,३५६.
बालकांवर जागेवर उपचार : याशिवाय प्रथम फेरीत १७ संदर्भ सेवा शिबिरात ३१९४ अंगणवाडीतील १०,३९५, तर दुसऱ्या फेरीत १८ शिबिरांत ३९०२ अंगणवाडीच्या १२,५७६ बालकांवर, तसेच ६६९२ शाळांमध्ये २५,६७१ बालकांवर जागेवर उपचार केल्यामुळे यात एकूण ३८,०६६ बालक रोगमुक्त झाले.