ऊसदरात ‘गुजरात’ला कोल्हापूर भारी : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा दर ‘गणदेवी’च्या बरोबरीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:39 AM2018-12-19T00:39:15+5:302018-12-19T00:40:01+5:30

ऊसदराचे आंदोलन पेटले की सगळेजण गुजरातमधील साखर कारखान्यांच्या ऊसदराकडे बोट करतात; पण गेल्या २०१७-१८ या हंगामात गुजरातमधील कारखान्यांपेक्षा कोल्हापुरातील कारखान्यांनीच अधिक दर दिला आहे

Kolhapur heavy to 'Gujarat' in Odisha: 'Bidri' sugar factory rate equals 'Ganedee' | ऊसदरात ‘गुजरात’ला कोल्हापूर भारी : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा दर ‘गणदेवी’च्या बरोबरीने

ऊसदरात ‘गुजरात’ला कोल्हापूर भारी : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा दर ‘गणदेवी’च्या बरोबरीने

googlenewsNext

कोल्हापूर : ऊसदराचे आंदोलन पेटले की सगळेजण गुजरातमधील साखर कारखान्यांच्या ऊसदराकडे बोट करतात; पण गेल्या २०१७-१८ या हंगामात गुजरातमधील कारखान्यांपेक्षा कोल्हापुरातील कारखान्यांनीच अधिक दर दिला आहे. गुजरातमधील ज्या कारखान्याचा देशभर गवगवा केला जातो, त्या ‘गणदेवी’ कारखान्याने ३१०५ रुपये दर दिला असून, सर्वांत कमी ‘कनथा’ कारखान्याने २०२० रुपये अंतिम दर दिला आहे.

महाराष्ट्रात ऊसदराचा प्रश्न वर्षभर राहतो. हंगामाच्या अगोदर महिना-दीड महिना शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती सुरू राहते आणि ऊस परिषदेच्या माध्यमातून दराच्या आकड्याची घोषणा केली जाते. त्यानंतर दरावरून आंदोलन भडकते आणि सारा महाराष्टÑ धगधगत राहतो. गुजरातमधील साखर कारखाने दर देतात; मग महाराष्टÑातील का नाही? असा सवालही केला जातो. शेतकरी संघटनेचा या आरोपात काही प्रमाणात तथ्य आहे.

गुजरातमधील कारखान्यांनी २०१६-१७ या हंगामात शेतकºयांना सरासरी ३५०० रुपयांच्या वर दर दिला. ‘गणदेवी’ कारखान्याने या हंगामात ४४४१ रुपये प्रतिटन दर दिला; पण गेल्या हंगामात (२०१७-१८) साखरेच्या कोसळलेल्या दराने या कारखान्यांना ३००० रुपये दर देताना दमछाक उडाली. ‘गणदेवी’ कारखान्याने ३१०५ रुपये दर दिला, तर उर्वरित कारखान्यांचे दर २०२० पासून २८३२ रुपयांपर्यंत राहिले. त्याचवेळी कोल्हापुरातील कारखान्यांनी सरासरी तीन हजार रुपये दर देऊन ‘गणदेवी’शी बरोबरी साधली. सर्वाधिक दर बिद्री (ता. कागल)च्या दूधगंगा-वेदगंगा कारखान्याने ३१०० रुपये दिला. त्यामुळे दराच्या तुलनेत कोल्हापूरच भारी ठरल्याचे दिसते.

गुजरात व कोल्हापुरातील गत हंगामांतील ऊसदर असा -
गुजरात २०१६-१७ २०१७-१८ कोल्हापूर २०१६-१७ २०१७-१८
गणदेवी ४४४१ ३१०५ दत्त-शिरोळ ३११५ ३०२५
बारडोली ३९५४ २८३२ जवाहर ३१२५ ३०७५
चलथान ३८५६ २७३६ गुरुदत्त ३१४८ ३०५४
माधी ३५०४ २६११ शाहू-कागल ३१२५ ३०३२
मेहुवा ३१०७ २४५१ हमीदवाडा ३००० ३०५०
सायन ३७०५ २७४१ बिद्री ३००१ ३१००
कामराज ३५०६ २४०६ कुंभी ३०६० ३०००


गुजरातचा दर जादा हवाच
कोल्हापुरातील कारखाने सभासदांना सवलतीच्या दरात महिन्याला साखर व इतर सुविधा देतात. गुजरातमधील कारखाने त्या देत नाहीत. तुलनेने गुजरातच्या साखरेला प्रतिक्विंटल १५० रुपये जादा दर मिळत असल्याने कोल्हापूरच्या तुलनेत गुजरातचा दर किमान प्रतिक्विंटल ५०० रुपये जादा असायलाच पाहिजे.

Web Title: Kolhapur heavy to 'Gujarat' in Odisha: 'Bidri' sugar factory rate equals 'Ganedee'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.