कोल्हापूर हायकर्सनी पन्हाळगड दीपोत्सवाने उजळला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:15 PM2023-11-11T12:15:10+5:302023-11-11T12:15:56+5:30

पन्हाळा : इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी मंदिर, ताराराणी राजवाडा याठिकाणी दीपावलीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर हायकर्स यांच्यावतीने उत्साहात ...

Kolhapur hikers lit up Panhalgad with Dipotsava | कोल्हापूर हायकर्सनी पन्हाळगड दीपोत्सवाने उजळला

कोल्हापूर हायकर्सनी पन्हाळगड दीपोत्सवाने उजळला

पन्हाळा : इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी मंदिर, ताराराणी राजवाडा याठिकाणी दीपावलीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर हायकर्स यांच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत व हर्षल सुर्वे, पन्हाळा मार्गदर्शक हनिफ नगारजी मान्यवर हजर होते. यावेळी इंद्रजित सावंत यांनी छत्रपती ताराराणी यांच्या कर्तबगारीची माहिती दिली. 

ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरांत दिवाळी साजरी करतोय तेच गड-किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात. एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना मानवंदना देण्यासाठी दीपोत्सव करत असल्याचे हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एक सांज पन्हाळगडावर स्वराज्याच्या गडकोटांवर एक सांज पन्हाळगडावर धनत्रयोदशीची संध्याकाळ या संकल्पनेतून वर्षभर अपरिचित गडकिल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून या ग्रुपची ओळख. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्त्व प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात नेहमीच पुढे असतात.

आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्सतर्फे गेल्या अकरा वर्षांपासून पन्हाळागडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जात आहे.

Web Title: Kolhapur hikers lit up Panhalgad with Dipotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.