कोल्हापूर : आण्णासाहेबाचा इतिहास मराठे विसरु शकत नाहीत : मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:28 IST2018-09-27T16:24:30+5:302018-09-27T16:28:31+5:30

संपूर्ण महाराष्ट्राभर मराठा समाजाचे ४० वर्षापूर्वी लाखोचे मेळावे घेणारे, स्वांतत्र्यानंतर मराठा समाजाचे प्रथम आरक्षणाची मागणी करणारे मराठ्यांसाठी आमदारकीपणाला लावून आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे कै. आण्णासाहेबाचा इतिहास मराठा समाज कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.

Kolhapur: The history of Annasaheb can not be forgotten by the Marathe: Muliq | कोल्हापूर : आण्णासाहेबाचा इतिहास मराठे विसरु शकत नाहीत : मुळीक

कोल्हापूर : आण्णासाहेबाचा इतिहास मराठे विसरु शकत नाहीत : मुळीक

ठळक मुद्देआण्णासाहेबाचा इतिहास मराठे विसरु शकत नाहीत : मुळीकअखिल भारतीय मराठा महासंघातर्फे अभिवादन

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राभर मराठा समाजाचे ४० वर्षापूर्वी लाखोचे मेळावे घेणारे, स्वांतत्र्यानंतर मराठा समाजाचे प्रथम आरक्षणाची मागणी करणारे मराठ्यांसाठी आमदारकीपणाला लावून आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे कै. आण्णासाहेबाचा इतिहास मराठा समाज कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.

मंगळवारपेठ येथे मराठा महासंघाच्या कार्यालयात अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै. आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, पाटील यांनी मराठा आरक्षणासह संपूर्ण हयात माथाडी कामगारांच्या स्वाभिमान व अभिमानासाठी खर्ची घालवली. माथाडी कामगाराच्या अस्तित्वासाठी संपूर्ण देशात पहिल्यादाच माथाडी कायदा लागू करून घेतला.

कै. आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी करवीर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, कार्याध्यक्ष उत्तम जाधव, संघटक प्रकाश पाटील, शरद सांळुखे, युवकध्यक्ष अवधूत पाटील, संतोष घाडगे, गौरव पाटील, अनिल पाटील, शुभम शिरहट्टी, महेश जाधव, किरण कणसे, अमोल चिकळकर यांच्यासह सकल मराठा समाज उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapur: The history of Annasaheb can not be forgotten by the Marathe: Muliq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.