राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा सन्मान
By admin | Published: September 24, 2014 01:13 AM2014-09-24T01:13:57+5:302014-09-24T01:15:59+5:30
‘स्कॉच मेरिट आॅफ आॅर्डर’ पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर : स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच मेरिट आॅफ आॅर्डर’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. स्कॉच अॅवार्डचे वरिष्ठ अधिकारी आर. के. बजाज यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यावतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले आणि उपजिल्हाधिकारी भूसंपादन स्वाती देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी मध्य प्रदेशच्या महिला व बालविकासमंत्री माया सिंग उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्ह्णात स्वीप (सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) ही मोहीम गेली दोन वर्षे प्रमाणावर राबविली. या उपक्रमाला स्कॉच निवड समितीकडून ‘द बेस्ट प्रोजेक्ट इन द कंट्री’ म्हणून गौरवण्यात आले. या प्रोजेक्टला ‘स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट’ बहुमान प्राप्त झाला. मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यात जिल्हा प्रशासनाने ठोस प्रयत्न केले. सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणूक २०१४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदारांनी मतदान केले. त्यामुळे ‘व्होटर्स टर्न आऊट’मध्ये कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला.