कोल्हापूर : स्वामी विवेकानंद संस्थेच्या इमारतीस पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:40 PM2018-10-23T16:40:58+5:302018-10-23T16:43:10+5:30

कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद अश्रम व अद्यात्मिक केंद्राच्या सुशोभिकरणाच्या सुरु असलेल्या इमारत बांधकामास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन माहिती घेतली.

Kolhapur: Honoring the wishes of the Guardian in the building of Swami Vivekananda Society | कोल्हापूर : स्वामी विवेकानंद संस्थेच्या इमारतीस पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

कोल्हापूरात मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद अश्रम व अध्यात्मिक केंद्राच्या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीस जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी अध्यक्ष आनंदराव पायमल, अभियंता निकम, अभियंता व सुपरवायझर नरेंद्र पायमल, उपाध्यक्ष सतिश पोवार, विश्वस्त, नागरीक उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देस्वामी विवेकानंद संस्थेच्या इमारतीस पालकमंत्र्यांची सदिच्छा भेटबांधकामाचा घेतला आढावा : कामास निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन

कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद अश्रम व अद्यात्मिक केंद्राच्या सुशोभिकरणाच्या सुरु असलेल्या इमारत बांधकामास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन माहिती घेतली. इमारतीचे दुसऱ्या टप्प्यातील सुरु असलेले काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच इमारतीशेजारी असणाऱ्यां नवदुर्गातील द्वितीय अवतार श्री मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) देवीच्या मंदीराचाही लवकरच जिर्णोद्वार करावा अशीही अपेक्षा व्यक्त केली.

श्री स्वामी विवेकानंद अश्रम व अद्यात्मिक केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च असणाऱ्या या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे स्लॅबचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या मजल्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम स्थळी भेट दिली.

केंद्राचे अध्यक्ष आनंदराव पायमल यांनी मंत्री पाटील यांना श्री स्वामी विवेकानंद यांच्या आत्मचरित्राची प्रत देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बांधकामाचाबत अभियंता निकम आणि अभियंता व सुपरवायझर नरेंद्र पायमल यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.

इमारतीच्या कामाबाबत मंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त करत निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच केंद्राचे हितचिंतक उद्योगपती चंद्रकांत जाधव हे बाहेर गावी असल्याने मंत्री पाटील यांनीही त्यांच्याशी मोबाईलवरुन चर्चा केली. यावेळी केंद्राचे उपाध्यक्ष सतिश पोवार, सचीव चंद्रकांत देसाई यांच्यासह सर्व विश्वस्त, संदीप चौगुले, अमर साळोखे, वैभव माने आदी भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री मुक्तांबिका मंदीराचाही जिर्णोद्वार करा

नवदुर्गातील द्वितीय अवतार श्री मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) देवीचे मंदीरही स्वामी विवेकानंद अश्रम व अध्यात्मिक केंद्राच्या आधिपत्याखाली असल्याने मुख्य इमारत बांधकामानंतर मंदीराचाही जिर्णोद्वार तातडीने करावा अशाही सुचना मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी विश्वस्थांना दिले.

 

 

Web Title: Kolhapur: Honoring the wishes of the Guardian in the building of Swami Vivekananda Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.