कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 04:09 PM2019-01-04T16:09:36+5:302019-01-04T16:11:16+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी निवृत्ती चौक येथील सावित्रीबाई फुले व्यासपीठावर शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महिलांचा व महानगरपालिकेतील महिला झाडू कामगारांचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी निवृत्ती चौक येथील सावित्रीबाई फुले व्यासपीठावर शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महिलांचा व महानगरपालिकेतील महिला झाडू कामगारांचा पश्चिम महाराष्ट्र
देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
निवृत्ती चौक येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यासपीठावर सावित्रीबार्इंच्या जयंतीचा कार्यक्रम सुरू करावा, अशी अपेक्षा नुकतेच दिगंवत झालेले ज्येष्ठ सिने दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार गतवर्षापासून या दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
गुरुवारी झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात कै. यशवंत भालकर यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर रौप्यमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या पोरे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका मधुरा पोरे यांचा सत्कार महेश जाधव यांच्या हस्ते, रा. ना. सामाणी विद्यालयातील निवृत्त शिक्षिका आरती सिद्धनेर्लीकर यांचा भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या हस्ते, तर महानगरपालिकेच्या वि. स. खांडेकर प्रशालेतील सहायक शिक्षिका संगीता गिरी - गोसावी यांचा राहुल चिकोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सावित्रीबार्इंची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या प्रभा टिपुगडे, प्रभा इनामदार, वैशाली पसारे, शशिकला मोरे, दीपा ठाणेकर, शारदा लोहार यांच्या हस्ते महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा साडी-चोळीची ओटी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पंचगंगा नागरी सहकारी बॅँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल केशव गोवेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभ कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक अजित ठाणेकर यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत आराध्ये यांनी केले. यावेळी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.