कोल्हापूर : डिझेल दर वाढीचा एस. टी.ला फटका, महिन्याला २० लाखांचा अतिरिक्त भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 02:38 PM2018-09-05T14:38:18+5:302018-09-05T14:39:53+5:30
डिझेलचे दर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ७५ रुपयांवर गेल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला महिन्याला सुमारे २० लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. तिकीट दरवाढ व डिझेलची दररोज होणारी वाढ यामुळे महामंडळ दुहेरी संकटात सापडले आहे.
कोल्हापूर : डिझेलचे दर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ७५ रुपयांवर गेल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला महिन्याला सुमारे २० लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. तिकीट दरवाढ व डिझेलची दररोज होणारी वाढ यामुळे महामंडळ दुहेरी संकटात सापडले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एस.टी.चा तोटा भरून काढण्यासाठी, कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि इंधन दरवाढीमुळे जूनमध्ये १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव लागू केला आहे. त्यामध्येच डिझेलच्या दररोजच्या दरवाढीचा व उत्पन्नाचा ताळमेळ घालताना विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे एस.टी.ला महिन्याला सुमारे २0 लाखांचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे.
एसटीचा तिकीटदर ठरवत असताना डिझेलचा दर महत्त्वाचा मानला जातो. ८९२ बसेस विभागात दररोज अडीच लाख किलोमीटर रस्त्यांवरून धावतात.
कोल्हापूर विभागाचा डिझेलवरील खर्च
जून - १२ कोटी ७१ लाख ६३ हजार
जुलै - १२ कोटी ८३ लाख ४० हजार
(सप्टेंबरमध्ये डिझेल दरवाढीने उच्चांक केल्याने अतिरिक्त खर्चांत वाढ होणार)