कोल्हापूर : पेन्शन योजनांची उत्पन्नाची मर्यादा वाढवा : चंद्रदीप नरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 03:23 PM2018-12-01T15:23:09+5:302018-12-01T15:24:32+5:30
शासनाच्या विविध पेन्शन योजनांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती ४३ हजार करावी, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली. सध्या २१ हजार मर्यादा असल्याने अनेक गरजू योजनेपासून वंचित राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : शासनाच्या विविध पेन्शन योजनांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती ४३ हजार करावी, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली. सध्या २१ हजार मर्यादा असल्याने अनेक गरजू योजनेपासून वंचित राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या वतीने विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना श्रावणबाळ, तर दारिद्र्यरेषेखालील व ज्यांचे वय ६५ वर्षे पूर्ण आहे, त्यांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनांच्या माध्यमातून पेन्शन दिली जाते.
यासाठी संबंधित गरजंूचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये असणे बंधनकारक आहे. यामध्ये वाढ करून ती ४३ हजार रुपये करावी, अशी मागणी आमदार नरके यांनी केली. यावर सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
अतिवृृष्टीत बाधित शेतकऱ्यांना मदत द्या
पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभी पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली असून, त्यांच्या पंचनाम्याची कामे झाली आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणीही आमदार नरके यांनी विधिमंडळात केली.