कोल्हापूर : ‘महारेरा’ च्या साहाय्याने कामकाजातील पारदर्शकता वाढवा : वसंत प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:32 PM2018-07-07T12:32:58+5:302018-07-07T12:41:37+5:30
ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कामकाजातील पारदर्शकता महत्त्वाची आहे; त्यामुळे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) साहाय्याने विक सक, बांधकाम व्यावसायिकांनी कामकाजातील पारदर्शकता वाढवावी, असे आवाहन ‘महारेरा’चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी येथे केले.
कोल्हापूर : ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कामकाजातील पारदर्शकता महत्त्वाची आहे; त्यामुळे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) साहाय्याने विक सक, बांधकाम व्यावसायिकांनी कामकाजातील पारदर्शकता वाढवावी, असे आवाहन ‘महारेरा’चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी येथे केले.
क्रिडाई कोल्हापूर, महारेरा आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आयोजित ‘महारेरा’ कायदाविषयक कार्यशाळेत ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवनातील या कार्यक्रमास ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष राजीव परीख, ‘महारेरा’ चे तांत्रिक अधिकारी डी. आर. हाडदरे, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी प्रमुख उपस्थित होते.
सचिव डॉ. प्रभू म्हणाले, विक सकांनी ‘महारेरा’ अंतर्गत नोंदणी केल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी त्यांच्या प्रकल्पाचे पूर्ण झालेले काम, सुधारणा आणि ग्राहकांच्या नोंदी संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे, त्यातून संबंधित प्रकल्पाची ग्राहकांना सर्व माहिती आॅनलाईन आणि घरबसल्या मिळते. आवश्यक ती माहिती मिळाल्याने ग्राहकांचे गैरसमज दूर होतात. विकसकांनी माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे. त्यांनी ‘महारेरा’ची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी.
या कार्यशाळेत ‘महारेरा’चे तांत्रिक सल्लागार गणेश जाव्हरे, प्रिन्सिपल कन्सल्टंट केतन अस्तिक, सीनिअर कन्सल्टंट हेतल हादियेल, आयटी सपोर्ट कन्सल्टंट विनित वायकूळ यांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
यावेळी शीतल नातू, आदित्य बेडेकर, निखिल अगरवाल, प्रतीक ओसवाल, लहू पटेल, विकेश ओसवाल, निर्मल पगारिया, अजय कोराणे, संदीप मिरजकर, आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील बांधकाम व्यावसायिक, विक सक उपस्थित होते.
‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी प्रास्ताविक केले, त्यात त्यांनी ज्याप्रमाणे विकसक, बांधकाम व्यावसायिकांना ‘महारेरा’ लागू केला. त्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या एनओसी देणाºया घटकांना या कायद्याच्या कक्षेत आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. रवी माने यांनी सूत्रसंचालन केले. ‘क्रिडाई कोल्हापूर’चे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी आभार मानले.
वसंत प्रभू म्हणाले,
- *‘महारेरा’ कडे दडपण म्हणून पाहू नका.
- * नोंदणी करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
- * सर्व सुविधा आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत.
- *विक सकांनी ‘रेरा’ नोंदणीचे बोधचिन्ह वापरावे.
- *पुढील काळ आॅनलाईनचा असल्याने त्यादृष्टीने कार्यरत रहावे.
कोल्हापुरात बेंचची स्थापना
ग्राहक आणि विक सक यांच्यातील तक्रारी, गैरसमज हे समोरासमोर चर्चा करून सोडविण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर येथे तक्रार निवारण बेंचची स्थापना केली आहे, त्यामध्ये ग्राहक आणि विक सकाच्या सहमतीने तक्रारींचे निवारण केले जाते. त्याचा चांगला परिणाम झाला असल्याचे सचिव डॉ. प्रभू यांनी सांगितले. ते म्हणाले, या स्वरूपातील बेंचची स्थापना कोल्हापूरमध्ये ग्राहक चळवळ आणि क्रिडाई कोल्हापूरच्या माध्यमातून व्हावी.