कोल्हापूर : भारत राखीव बटालियनची टिम लाचप्रकरणी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:22 PM2018-07-17T13:22:55+5:302018-07-17T13:26:51+5:30
जवानांकडुन चाळीस हजार रुपयांची लाच घेताना ‘भारत राखीव बटालियन ३’च्या उपअधिक्षकासह निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल व लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी रंगेहात पकडले.
Next
ठळक मुद्देभारत राखीव बटालियनची टिम लाचप्रकरणी जाळ्यातउपअधिक्षकासह सहा जणांचा समावेश : चाळीस हजाराची लाच घेताना पकडले.
कोल्हापूर : जवानांकडुन चाळीस हजार रुपयांची लाच घेताना ‘भारत राखीव बटालियन ३’च्या उपअधिक्षकासह निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल व लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी रंगेहात पकडले.
या कारवाईने खळबळ उडाली असून एका वेळी उपअधिक्षकासह सहाजण जाळ्यात अडकले आहेत.
संशयित उपअधिक्षक मनोहर गवळी, निरीक्षक मधूकर सकट, उपनिरीक्षक रमेश शिरगुप्पे, आनंदा पाटील, कॉन्स्टेबल पी. पी. कोळी, लिपीक आर. आर. जाधव अशी त्यांची नावे आहेत.