कोल्हापूर : अंबाबाई मंदीराची पोलीस अधिक्षकांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 04:07 PM2018-10-05T16:07:06+5:302018-10-05T16:09:40+5:30

नवरात्रौत्सवानिमित्त करवीर निवासीनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे. याकरीता जिल्हा पोलीस प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे विविध उपाययोजना, नियोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंदीर व परिसराची पाहणी केली.

Kolhapur: Inspect the Ambabai temple police superintendents | कोल्हापूर : अंबाबाई मंदीराची पोलीस अधिक्षकांकडून पाहणी

कोल्हापूरातील करवीर निवासीनी अंबाबाई मंदीरात नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शिवाजीराव जाधव, संगीता खाडे , धनाजी जाधव आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्देनवरात्रोत्सवानिमित्त पालखी मार्गासह चारही दरवाजांची केली पाहणी सुरक्षा व्यवस्थेचाही घेतला आढावा

कोल्हापूर : नवरात्रौत्सवानिमित्त करवीर निवासीनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे. याकरीता जिल्हा पोलीस प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे विविध उपाययोजना, नियोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंदीर व परिसराची पाहणी केली.

अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपलेल्या नवरात्रौत्सवात देवीच्या दर्शनासाठी दहा दिवसांमध्ये राज्यासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी दोन लाखाहून अधिक भाविक पहाटे देवीचे दार उघडल्यापासून ते बंद होईपर्यंत दर्शन घेतात. यानिमित्त होणारी मंदीर व परिसरात होणारी गर्दी लक्षात घेवून जिल्हा पोलीस प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती विविध उपाय योजना व नियोजन करीत आहे.

याची पाहणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी मंदीर व परिसरातील चारही दरवाजे आणि गरुड मंडपात ठेवण्यात आलेली सुवर्ण पालखी यांची पाहणी करीत सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसंबधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी चर्चा करीत मंदीर व्यवस्थापनाच्या ६० सुरक्षारक्षकांशीही चर्चा करीत आढावा घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, विशेष वार्ता शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, सदस्या संगीता खाडे,सदस्य शिवाजीराव जाधव, मंदीर व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते.


 

 

Web Title: Kolhapur: Inspect the Ambabai temple police superintendents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.