पन्हाळ्यात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप; नागरिकांनी पाळला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 16:37 IST2022-09-18T16:34:47+5:302022-09-18T16:37:43+5:30

पर्यटनासाठी आलेल्या लोकांची बंदमुळे गैरसोय

Kolhapur Intervention of outside organizations in Panhala Citizens observed shutdown | पन्हाळ्यात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप; नागरिकांनी पाळला बंद

पन्हाळ्यात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप; नागरिकांनी पाळला बंद

पन्हाळा, लोकमत न्यूज नेटवर्क: पन्हाळ्यातील व्यवसायिक व नागरिक यांच्याबद्दल बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप होत असलेच्या निषेधार्थ संपूर्ण पन्हाळा आज बंद राहिला. पन्हाळ्यावरील व्यावसायिक व नागरिक तसेच पन्हाळा गडासंदर्भात सोशल मिडियावरुन व प्रत्यक्ष धमकावणे या त्रासाला कंटाळून सर्व गावाने एकत्र येत उस्फूर्तपणे बंद पाळला.

पावसामुळे पन्हाळ्यावरील बुरुज आणी तटबंदी ढासळत आहेत. त्याचे विकृत चित्रीकरण करुन सोशल मिडियावर टाकत पन्हाळाच्या नागरिकांवर टीका- टिप्पणी केली जाते. त्याचबरोबर एका अतिरेकी संघटनेच्या लोकांनी लंडन बसला हे नांव नको म्हणून नावे उपटुन काढली. यामुळे पन्हाळ्यावरील वातावरण तापले. याबाबत नागरिकांनी पोलिस, नगरपरिषद, तहसीलदार यांना निवेदन दिले होते, पण याची दखल घेतली नसल्याने पन्हाळा बंद ठेवून सर्वांनी शासनाचा निषेध केला. बंदमुळे आज पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची चांगलीच गैरसोय झाली.

पन्हाळा नगरपरिषद प्रवासी कर गोळा करते त्या पैशातून पडझड झालेले बांधकाम करा, असा सल्ला विविध संघटना करतात. खरे तर नगरपरिषद गोळा करत असलेल्या पैशातून विविध विकासकामे केली जातात. याचे लेखापरीक्षण होत असते. त्याबरोबरच पन्हाळा शहर गेली चार वर्षे देशात स्वच्छता क्षेत्रात पहिला नंबर मिळवत आहेत. त्यासाठी हे पैसे खर्च होतात. तसेच पुरातत्व विभाग तटबंदी व बुरुज बांधकामासाठी त्यांच्या नियमाप्रमाणे सतर्क आहेत. त्याचा पाठपुरावा पन्हाळा नागरिक करत आहेत. त्यामुळे विविध संघटनांकडून पन्हाळ्याची होत असलेली बदनामी थांबवावी, असे आवाहन बंदच्या निमित्ताने नागरिकांनी केले आहे.

Web Title: Kolhapur Intervention of outside organizations in Panhala Citizens observed shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.