कोल्हापूर : राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर, महिलाची दूचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 04:14 PM2019-01-12T16:14:26+5:302019-01-12T16:16:37+5:30
राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची ज्योत घेऊन कोल्हापूरात महिलांनी शनिवारी दूचाकी रॅली काढून जागर केला. मंथन फौंडेशन, उडान मंच व समन्वय २६ यांच्यातर्फे दूचाकी रॅलीचे आयोजन गांधी मैदान येथून करण्यात आले.
कोल्हापूर : राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची ज्योत घेऊन कोल्हापूरात महिलांनी शनिवारी दूचाकी रॅली काढून जागर केला. मंथन फौंडेशन, उडान मंच व समन्वय २६ यांच्यातर्फे दूचाकी रॅलीचे आयोजन गांधी मैदान येथून करण्यात आले.
गंगावेशीतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये (के.एम.सी) राजमाता जिजाऊच्या पुतळ्यास ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी महापौर सरिता मोरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक प्रतापसिंह जाधव,शेखर कुसाळे आदी उपस्थित होते.
ही ज्योत तेथून गांधी मैदान येथे आणण्यात आली. राजमाता जिजाऊच्या वेशभूषेत महिला, भगवे फेटे परिधान करुन रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक , शिवाजी पुतळा, दसरा चौकमार्गे ताराराणी चौकात रॅली विसर्जित झाली.
रॅलीत सहभागी झालेल्या महिलांना उत्कृष्ठ ब्रेफरी, उत्कृष्ठ घोषवाक्य, उत्कृष्ठ ग्रुप यांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ठ ब्रेफरी विलिशा शिंदे, उत्कृष्ठ ग्रुप शुभांगी साखरे , सीमा रेवणकर व उत्कृष्ठ घोषवाक्य प्रिया देसाई यांचा सन्मान करण्यात आला. स्नेहा राऊत यांनी ज्योत आणली.
रॅलीत गायत्री राऊत, जया शिंदे, वनिता ढवळे, अनिता चौगले, अर्पिता शेलार, दीपीका जाधव, समृद्धी चौगले आदींचा सहभाग होता. अंकुश कुलकर्णी , अभिषेक खाडे, प्रथमेश पाटील आदींनी याचे संयोजन केले.