कोल्हापूर : आठव्या माळेला जोतिबाची श्री.कृष्ण रूपात सालंकृत महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 04:48 PM2018-10-17T16:48:09+5:302018-10-17T16:49:01+5:30
नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबाची कमळ पुष्पात श्री. कृष्ण रूपात सालंकृत महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. गुरुवारी पालखी सोहळा व सीमोल्लंघन होणार आहे.
जोतिबा/कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबाची कमळ पुष्पात श्री. कृष्ण रूपात सालंकृत महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. गुरुवारी पालखी सोहळा व सीमोल्लंघन होणार आहे.
श्री. जोतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात. नवरात्रोत्सवाच्या आठव्यामाळे निमित कमळ पुष्प मध्ये श्री.कृष्ण रूपात महापूजा बांधली. सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत- गाजत धुपारती सोहळा निघाला.
नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस हा धुपारती सोहळा निघतो. आठव्या माळेला भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तेल ' अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले.
नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबा देवाची बांधण्यात आलेली कमळ पुष्प पाकळीतील श्री कृष्ण रूपातील खडी सांलकृत महापूजा