कोल्हापूर : संयुक्त एस.टी. कामगार कृती संघटनेच्यावतीने निदर्शने, नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 06:09 PM2017-12-28T18:09:25+5:302017-12-28T18:17:45+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्याने अनेक परीक्षार्थी परीक्षेला मुकले आहेत. त्यामुळे या परीक्षा नव्याने घेण्याची मागणीसाठी संयुक्त कामगार कृती संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Kolhapur: Joint ST Conflicts between the Labor Action Organision and the confusion in the recruitment process for the recruitment process | कोल्हापूर : संयुक्त एस.टी. कामगार कृती संघटनेच्यावतीने निदर्शने, नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेमध्ये गोंधळ

कोल्हापूर : संयुक्त एस.टी. कामगार कृती संघटनेच्यावतीने निदर्शने, नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेमध्ये गोंधळ

Next
ठळक मुद्देपरिवहन महामंडळाच्या नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेमध्ये गोंधळ संयुक्त कामगार कृती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्याने अनेक परीक्षार्थी परीक्षेला मुकले आहेत. त्यामुळे या परीक्षा नव्याने घेण्याची मागणीसाठी संयुक्त कामगार कृती संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

एस.टी.महामंडळातील कर्मचार्यांची भरती प्रक्रियेचा ठेका एका खाजगी कंपनीला देण्यात आल्याने यामध्ये मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप यावेळी कृती समितीने केला. याबाबतच निवेदनही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

एस.टी.महामंडळातील कर्मचायांची भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जानेवारी महिन्यात जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अनेकानी आॅनलाईन अर्ज केले. एका खाजगी कंपनीद्वारे परीक्षेद्वारे नोकरभरतीची प्रक्रिया सुरु आहे.
 

या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करीत महामंडळाने परीक्षा नव्याने घेण्याची मागणी संयुक्त कामगार कृती संघटनेच्यावतीने करण्यात आलीय. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

एस.टी. महामंडळामध्ये नोकरी मिळेल या अपेक्षेने अनेकांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र परीक्षा केंव्हा घेणार याचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे अनेकजण परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. शिवाय शिकावू उमेदवाराना ५० टक्के जागा राखीव ठेवण्याच जाहीर करण्यात आल होत. मात्र या शिकाऊ उमेदवारांना देखील डावलण्यात आले. त्यामुळे या भरती प्रक्रियेची परीक्षा नव्याने घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आले.

आंदोलनात चंद्रकांत यादव, फिरोजखान उस्ताद, दिलीप देसाई, अशोक यादव, बाळासाहेब पवार, महादेव जाधव, सुनील पाटील, उत्तम पाटील. मिका सुंगधी, आशिष कुरणे, अभिजीत चव्हाण, सुरेश साबळे, ऋषिकेश गुरव, निनाद मांगुरे, करण महाडिक, निखिल जाधव आदि उपस्थित होते.

 

Web Title: Kolhapur: Joint ST Conflicts between the Labor Action Organision and the confusion in the recruitment process for the recruitment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.