कोल्हापूर : ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 03:45 PM2018-08-24T15:45:08+5:302018-08-24T15:47:48+5:30

ऐतिहासिक वारसा व निसर्ग सौदर्यांने नटलेल्या कोल्हापूरात खास वास्तवादी शैली आहे. त्यामुळे ‘कलापूर एक्सप्रेस ’ हा उपक्रम देशभरात आदर्शव्रत ठरेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार नलिनी भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

Kolhapur: 'Kalaipur Express' will be ideal across the country: Nalini Bhagwat | कोल्हापूर : ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवत

कोल्हापूर : ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवत

Next
ठळक मुद्दे ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवतल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरणासाठी आयोजित केलेल्या ‘कलापूर एक्सप्रेस’

कोल्हापूर : ऐतिहासिक वारसा व निसर्ग सौदर्यांने नटलेल्या कोल्हापूरात खास वास्तवादी शैली आहे. त्यामुळे ‘कलापूर एक्सप्रेस ’ हा उपक्रम देशभरात आदर्शव्रत ठरेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार नलिनी भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

त्या मध्य रेल्वे(पुणे विभाग)कॅम्लिन, एआयएसएएसएमएस यांच्यावतीने कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरणासाठी आयोजित केलेल्या ‘कलापूर एक्सप्रेस’ या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या.

भागवत म्हणाल्या, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या कलानगरीत अनेक पर्यटन स्थळे, निसर्गाने नटलेला परिसर आणि समृद्ध चित्रकारांचा वारसा आदींमुळे वास्तववादी चित्र शैली आहे. त्या शैलीतून हा रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचा स्तुत्य उपक्रम आहे.

ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव म्हणाले, जगभरातील पर्यटकांना भूरळ घालणारी कलानगरी आहे. त्यात निसर्गाने नटलेल्या शहराची व सांैदर्य स्थळांची जपणूक करणे गरजचे आहे. त्यात चित्रकार घडवणारी ही नगरी आहे. त्यामुळे हा उपक्रम देशात नव्हे तर परदेशातही गौरवणारा ठरेल. असा विश्वास व्यक्त केला.

यानिमित्त ४० हून अधिक चित्रकारांची नोंदणी करण्यात आली व त्यांना रंगसाहित्यासह कॅनव्हासही देण्यात आला. येत्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणची चित्रे काढून घेण्यात येणार आहेत.

या माध्यमातून येथील ऐतिहासिक वारशांचा पुन्हा एकदा चित्ररूपात जतन केले जाणार आहे. पर्यटकांना कोल्हापूरची ओळख तर होईलच; पण स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी व पर्यटन वृद्धीसाठी मोठा फायदाही होणार आहे.

मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य प्रबंधक कृष्णात पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमातील चित्रांमध्ये अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, पन्हाळा, जोतिबा, विशाळगड, पंचगंगा नदीघाट, साठमारी, गंगावेश, दूधकट्टा, शाहू जन्मस्थळ, खासबाग, कुस्ती मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, नवीन राजवाडा, टेंबलाई मंदिर, कात्यायनी, रंकाळा, रामलिंग, बाहुबली, नृसिंहवाडी, खिद्रापूर, मसाई पठार, पांडव लेणी, आदी पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

प्रास्ताविक मोहन शेट्ये यांनी केले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार के.आर. कुंभार, प्राचार्य अजेय दळवी, कॅम्लीन, कोकोयु कंपनीचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर अ‍ेझझा, मध्य रेल्वेचे वाणिज्य प्रबंधक एस.के.दास, चित्रकार प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, आदी मान्यवर चित्रकार मंडळी उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapur: 'Kalaipur Express' will be ideal across the country: Nalini Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.