कोल्हापूर : निवडणूक वादातून केर्लेत हाणामारी, दोन्ही बाजूंचे चौघे जखमी : परस्परविरोधी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:05 AM2018-03-03T11:05:48+5:302018-03-03T11:05:48+5:30

केर्ले (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. काठ्या व लोखंडी गजांनी केलेल्या मारहाणीत दोन्ही बाजूंचे चौघे जखमी झाले.

Kolhapur: Karme riot kills from election, injures four on both sides: conflicting crime | कोल्हापूर : निवडणूक वादातून केर्लेत हाणामारी, दोन्ही बाजूंचे चौघे जखमी : परस्परविरोधी गुन्हे

कोल्हापूर : निवडणूक वादातून केर्लेत हाणामारी, दोन्ही बाजूंचे चौघे जखमी : परस्परविरोधी गुन्हे

Next
ठळक मुद्देनिवडणूक वादातून केर्लेत हाणामारीदोन्ही बाजूंचे चौघे जखमी परस्परविरोधी गुन्हे

कोल्हापूर : केर्ले (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. काठ्या व लोखंडी गजांनी केलेल्या मारहाणीत दोन्ही बाजूंचे चौघे जखमी झाले.

सचिता सर्जेराव पाटील (वय ४५), त्यांचे पती सर्जेराव रामचंद्र पाटील (५०), शुभांगी प्रसाद पाटील (२६), प्रसाद दत्तात्रय पाटील (३२) अशी जखमींची नावे आहेत. या चौघांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी (दि. १) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.

अधिक माहिती अशी, केर्ले ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये कृष्णात पाटील हे विजयी झाले. यावेळी विजयी मिरवणुकीमध्ये संशयित प्रसाद पाटील याने सचिता पाटील यांच्या घरात सुतळी फटाका पेटवून टाकला. त्याचा जाब विचारण्यासाठी सचिता व त्यांचे पती सर्जेराव पाटील गेले असता दोन्ही कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली.

काठ्या, लोखंडी गजांचा वापर झाल्याने चौघेजण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने पोलिसांनी संशयित चौघा जखमींसह कमल रामचंद्र पाटील (५०), स्वप्निल सर्जेराव पाटील (२८), सुभाष सर्जेराव पाटील (४८) यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप जाधव अधिक तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Karme riot kills from election, injures four on both sides: conflicting crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.