कोल्हापूर/ कसबा बावडा : ‘राजाराम’ची सभा मंजूर मंजूरच्या जयघोषात अर्धा तासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:28 PM2018-09-28T17:28:54+5:302018-09-28T17:31:42+5:30

कसबा बावडा (ता. करवीर) येथील श्री. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अर्धा तासातच आटोपली. कारखान्याचे कार्यकारी संचालक अनंत निकम यांनी अहवालावर आलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरे देत असतानाच सत्तारूढ गटाच्या समर्थकांच्या मंजूर मंजूर अशा घोषणेतच सभा संपली

Kolhapur / Kasba Baawada: A meeting of 'Rajaram' in the halting of sanctioned sanction in half an hour | कोल्हापूर/ कसबा बावडा : ‘राजाराम’ची सभा मंजूर मंजूरच्या जयघोषात अर्धा तासात

कोल्हापूर/ कसबा बावडा : ‘राजाराम’ची सभा मंजूर मंजूरच्या जयघोषात अर्धा तासात

Next
ठळक मुद्देसभेनंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर

कोल्हापूर/ कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील श्री. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अर्धा तासातच आटोपली. कारखान्याचे कार्यकारी संचालक अनंत निकम यांनी अहवालावर आलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरे देत असतानाच सत्तारूढ गटाच्या समर्थकांच्या मंजूर मंजूर अशा घोषणेतच सभा संपली. बोलण्यासाठी माईक न दिल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी समांतर सभा घेऊन कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढले. सभेनंतर सभागृहात सत्तारूढ आणि विरोधक आमने-सामने आले आणि आपआपल्या नेत्यांचा जयघोष सुरू केल्याने गोंधळ उडाला, त्यातूनच एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. पोलीसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही गट सभागृहातून बाहेर गेले.

छत्रपती राजाराम कारखान्याची सभा शुक्रवारी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक महादेवराव महाडीक यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर झाली. कारखान्याचे अध्यक्ष हरिष चौगले यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात महादेवराव महाडीक म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात सुरूवातीला साखरेचे दर चांगले होते तोपर्यंत शेतकऱ्यांना एक रकमी सगळे पैसे दिले, पण त्यानंतर साखर २४०० रूपयांवर आल्याने सगळ्या कारखानदारीसमोर अडचणी आल्या. तरीही ‘राजाराम’ने शेतकºयांची एक रूपयाची एफआरपी थकवली नाही. साखरेचे दर घसरल्यामुळेच अहवालात तोटा दिसतो. पण आता साखरेचे दर चांगले असल्याने हा उद्योग स्थिरावेल. पण मराठवाड्यात पाऊस चांगला झाल्याने ऊस तोडणी मजूरांचा प्रश्न आहे.

आगामी काळात ऊस तोडणी यंत्रे आणावी लागतील. पुर्वी साखरेतून गोळा होणाºया करातून कारखान्यांना नूतनीकरण, विस्तारीकरणासाठी ७ टक्के दराने कर्जे दिली जायची आता जीएसटी मुळे हे सगळे बंद झाले असून त्यामध्येही सरकारने तरतुद करावी. अशी मागणीही महाडीक यानंी केली.

कार्यकारी संचालक अनंत निकम हे लेखी प्रश्नांवर उत्तरे देत असतानाच सत्तारूढ गटाच्या सभासदांनी मंजूर मंजूर अशा घोषणा सुरू केल्या आणि वंदे मातरम सुरू झाले. वंदे मारतम संपताच सत्तारूढ गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘महाडीक महाडीक धूम धडाका’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. विरोधकांनीही ‘बंटी बंटी’ अशा घोषणा सुरू केल्या. घोषणा देत दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

शहर पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर पोलीसांसह सभागृहात आल्यानंतर दोन्ही गट शांत झाले. संचालक दिलीप पाटील यांनी आभार मानले. आमदार अमल महाडीक, माजी महापौर शिवाजीराव कदम, सुनील कदम, सत्यजीत कदम, मानद तज्ञ सल्लागार पी. जी. मेढे, सचिव उदय मोरे यांच्यासह संचालक उपस्थित होते.
दरम्यान, कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधकांनी समांतर सभा घेतली. नेजदार म्हणाले, कारखान्याच्या कारभाराबाबत आमचे अनेक प्रश्न होते, पण त्याला सत्तारूढांकडे उत्तरे नसल्याने आम्हाला प्रश्न विचारू दिले नाहीत. नितीत पारखे म्हणाले, सभासद कारखान्याचे मालक आहेत मग अठरा वर्षात सभासदांना किती प्रश्न विचारू दिले. हीच महाडीक यांची लोकशाही आहे का? विचारलेल्या प्रश्नांची पोष्टाने उत्तरे देणार असाल तर सभा कशासाठी घेता? गुंड आणून फार काळ सभा चालवता येणार नाही. कारखान्यातील मुरूम संचालकांच्या घरात कसा गेला ? असा सवालही त्यांनी केला.


सभा सुरू होण्यापुर्वीच गोंधळ
दोन्ही गटाने सभेची जोरदार तयारी केली होती, सत्तारूढ गटाचे सभासद सकाळी आठ पासूनच सभास्थळी हजर होते. विरोधकही पुर्ण ताकदीनिशी आल्याने वातावरण तणावपुर्ण होते. सभा सुरू होण्यापुर्वीच अनेक वेळा बसण्यावरून दोन्ही गटात गोंधळ उडायचा.


हत्ती चालला की भुंकणाºयांची संख्या वाढते
महादेवराव महाडीक यांचे भाषण सुरू असताना, आम्हाला माईक द्या बोलायचे आहे असे विरोधी गटाचे सभासद ओरडत होते. त्याला सत्तारूढ गटाच्या सभासदांनी प्रतिउत्तर केल्याने गोंधळ उडाला. शांत रहा आम्हाला सभा चालवायची आहे, हत्ती चालल्यानंतर भुकंणाºयांची सख्या वाढते, त्याकडे लक्ष देऊ नका, असे महाडीक यांनी टोला हाणला.


कर्मचाºयांचे अभिनंदन
गेल्या हंगामात कर्मचाºयांनी प्रामाणिकपणे नियोजनबद्द काम केल्याने हंगाम यशस्वी झाल्याचे सांगत कर्मचाºयांचे अभिनंदन महाडीक यांनी केले. तर साखरेची २९०० रूपये किंमत निश्चित केल्याबद्दल केंद्राच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी करण्यात आला.
----------------------------------------------
सहवीज प्रकल्प, विस्तारीकरणाला परवानगी
कारखान्याचे संपुर्ण कामकाज संगणीकरणावर सुुरू असल्याने उत्पादन खर्च कमी होतो. आगामी काळात सहवीज प्रकल्प व कारखान्याचे विस्तारीकरण करणार असून त्याला परवानगी मिळाल्याचे महाडीक यांनी सांगितले.


खोट्या सह्या करून आला तरीही उत्तरे देतो
महाडिक यांचे भाषण सुरू असताना विरोधी गटाचे नितीन पारखे यांनी हस्तक्षेप केला. यावर सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देणार, बावड्यातील काही मंडळी खोट्या सह्या करून आली आहेत, त्यांनाही उत्तरे देतो. लोकशाही पध्दतीने येथे काम करतो, इतर ठिकाणी काय सुरू आहे? अशी विचारणा महाडीक यांनी केली.


ऊस पुरवठा न करणाºया सभासदांना साखर
कारखान्याचे सभासद आहेत पण ऊस पुरवठा करत नाहीत, अशा सभासदांची साखर बंद करण्यात आली होती. पण सभासदांच्या आग्रहाखातर यंदापासून प्रतित् महिना तीन किलो साखर देणार असल्याची घोषणा महाडीक यांनी केली.
 


कारखान्याची सभा ३६ मिनिटे चालली, सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. ही लोकशाही केवळ ‘राजाराम’ मध्येच आहे.
- महादेवराव महाडीक (ज्येष्ठ संचालक)

 


कारखान्याच्या कारभाराबाबत सभासदांचे प्रश्न होते, पण त्यांच्याकडे उत्तरेच नसल्याने हुकूमशाही पध्दतीने सभा गुंडाळली.
- विश्वास नेजदार (माजी अध्यक्ष)
 

 

 

Web Title: Kolhapur / Kasba Baawada: A meeting of 'Rajaram' in the halting of sanctioned sanction in half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.