कोल्हापूरात कात्यायनी मंदिरात चोरी, चांदीचे दागिने केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:37 AM2018-09-12T11:37:53+5:302018-09-12T13:51:49+5:30

कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या कात्यायनी देवीच्या मंदिरातील दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी पंचारती, देवीच्या दोन मुकुटासह अंदाजे दोन किलो वजनाच्या चांदीचे दागिने पळवून नेले. बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

In Kolhapur, Katyayani temple was stolen, silver ornaments, lamps | कोल्हापूरात कात्यायनी मंदिरात चोरी, चांदीचे दागिने केले लंपास

कोल्हापूरात कात्यायनी मंदिरात चोरी, चांदीचे दागिने केले लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूरात कात्यायनी मंदिरात चोरीचांदीचे दागिने केले लंपास

कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या कात्यायनी देवीच्या मंदिरातील दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी पंचारती, देवीच्या दोन मुकुटासह अंदाजे दोन किलो वजनाच्या चांदीचे दागिने पळवून नेले. बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

कोल्हापूर शहराजवळच असलेल्या कात्यायनी मंदिराला प्राचीन परंपरा आहे. शहराच्या अगदी जवळच हे क्षेत्र असल्याने येथे परिसरातील भाविक आणि पर्यटकही भेट देत असतात. या मंदिराच्या परिसरातच रामचंद्र विष्णु गरव (बालिंगा) हे पुजारी कुटूंबियांहसह राहतात.

बुधवारी पहाटे ते शिरस्त्याप्रमाणे पूजा करण्यासाठी मंदिरात आले, तेव्हा मंदिराचा लोखंडी दरवाजा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता त्यांना देवीच्या गर्भगृहातील संस्थानकालीन पंचारती, चांदीचे दोन मुकुटासह चांदीचे दागिने चोरल्याचे आढळले. मंदिराच्या दर्शन मंडपातील छोटे लाकडी दरवाजे व लोखंडी कपाटही चोरट्यांनी उचकटले होते. गुरव यांनी चोरीची माहिती करवीर पोलिसांत दिली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मंदिराच्या दर्शन मंडपातील छोटे लाकडी दरवाजे व लोखंडी कपाटही चोरट्यांनी उचकटले.

करवीरचे पोलिस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. मंदिरातील दोन चांदीची ताटे, देणगीची काही रक्कम तसेच पितळेची भांडी चोरट्यांनी चोरलेली नाहीत, शिवाय गाभाऱ्यातील कपाटांची कुलपं काढून चोरी केल्याचे आढळून येते. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण केले, परंतु श्वानाने मंदीराच्या आवारातून फक्त मुख्य रस्त्यापर्र्यतच माग काढला.

देवस्थान समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या या मंदिराचा परिसर निर्जन आहे. येथे सुरक्षा रक्षकही नसल्याने पुजारी गुरव यांनी स्वत: सहा सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र गेल्या तीन दिवसापासून ते बंद आहेत. त्यामुळे मंदिर परिसराची खडानखडा माहित असणाऱ्यांनीच चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Web Title: In Kolhapur, Katyayani temple was stolen, silver ornaments, lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.