कोल्हापूर : ‘स्वातंत्र्यदिना’संदर्भातील सर्व जबाबदाऱ्या सुरळीत पार पाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:32 PM2018-08-11T16:32:14+5:302018-08-11T16:55:02+5:30
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनाचा मुख्य समारंभ बुधवारी (१५ आॅगस्ट) सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदाऱ्या सुरळितपणे पार पाडाव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी शनिवारी येथे दिल्या.
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनाचा मुख्य समारंभ बुधवारी (१५ आॅगस्ट) सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदाऱ्या सुरळितपणे पार पाडाव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी शनिवारी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या तयारीची आढावा बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारीस, करवीरचे प्रभारी तहसीलदार गणेश शिंदे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील, निवडणूक तहसीलदार सविता लष्करे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अविनाश पोळ, नायब तहसीलदार प्रकाश दगडे, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व कामे संबंधित विभागांनी वेळीच व सुरळीत पार पाडावीत, अशी सूचना सर्व यंत्रणांना केली. तसेच प्लास्टिकचे झेंडे वापरू नयेत, ध्वजाचा योग्य सन्मान राखण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही केले.
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या तयारीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी एस. आर. माने, गणेश शिंदे, प्रकाश दगडे, सविता लष्करे, डॉ. स्टिव्हन अल्वारीस, अजित पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.