Kolhapur: कोल्हापूर बाजार समितीच्या चाव्या मुश्रीफ, कोरे, पी. एन पाटील आघाडीकडे, सता कायम राखण्यात यश

By राजाराम लोंढे | Published: April 30, 2023 01:16 PM2023-04-30T13:16:24+5:302023-04-30T13:16:47+5:30

Kolhapur: कोल्हापूर शेती बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या.

Kolhapur: Keys to the Kolhapur Bazar Committee Mushrif, Kore, p. N Patil to the front, success in maintaining the streak | Kolhapur: कोल्हापूर बाजार समितीच्या चाव्या मुश्रीफ, कोरे, पी. एन पाटील आघाडीकडे, सता कायम राखण्यात यश

Kolhapur: कोल्हापूर बाजार समितीच्या चाव्या मुश्रीफ, कोरे, पी. एन पाटील आघाडीकडे, सता कायम राखण्यात यश

googlenewsNext

- राजाराम लोंढे 
कोल्हापूर - कोल्हापूर शेती बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकत बाजार समितीच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा ताब्यात ठेवल्या.

विरोधी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पँनेलचा पुरता धुव्वा उडाला. हमाल तोलाईदार गटात अपक्ष बाबूराव खोत यांनी तर व्यापारी गटात परिवर्तन आघाडीचे  नंदकुमार वळंजू यांनी बाजी मारली.

व्यापारी गटात अटीतटीची लढत झाली असली तरी विकास संस्था व ग्रामपंचायत गटातील सत्ताधारी आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.

Web Title: Kolhapur: Keys to the Kolhapur Bazar Committee Mushrif, Kore, p. N Patil to the front, success in maintaining the streak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.