कोल्हापूर : परिख पुल वाहतूकीसाठी खुला, ड्रेनेज कामाची वर्क आॅर्डर : अद्याप काम सुरु नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:16 PM2018-05-07T16:16:04+5:302018-05-07T16:16:04+5:30
राजारामपुरी ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे रस्त्याला जोडणारा शहरातील सर्वात जुना बाबुभाई परिख पुल सोमवारी वाहतूकीसाठी खुला होता. पुलाखालील असलेल्या ड्रेनेजच्या कामामुळे वाहतूक बंद राहणार असल्याची चर्चा शहरात सुरु होती.
कोल्हापूर : राजारामपुरी ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे रस्त्याला जोडणारा शहरातील सर्वात जुना बाबुभाई परिख पुल सोमवारी वाहतूकीसाठी खुला होता.
पुलाखालील असलेल्या ड्रेनेजच्या कामामुळे वाहतूक बंद राहणार असल्याची चर्चा शहरात सुरु होती. पण, प्रत्यक्षात या मार्गावरील अवजड वाहतूक वगळून अन्य प्रकारच्या सर्व वाहनांची वाहतूक सुरु होती. या ड्रेनेज कामाची वर्क आॅर्डर झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम सुरु झाल्यानंतर हा या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरातील सर्वात जुना हा पुल आहे. या मार्गावर रोज हजारो वाहने ये-जा करतात. पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साठते. त्यामुळे दुर्तफा वाहतूक विस्कळीत होते. त्याचबरोबर पुलाखाली ड्रेनेजचे मैलमिश्रित पाणी वाहते. ते पाणी वाहनधारकांच्या अंगावर जाते. ड्रेनेजलाईनही जुन्या काळातील आहे. त्यामुळे ती कालबाह्य झाली आहे.
ड्रेनेजलाईन भरुन मैला रस्त्यावरुन वाहतोे. तसेच याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. ड्रेनेजमुळे अक्षरश : दुर्गंधी पसरते.वाहनधारकांना तोंड धरुन जावे लागते.येथील ड्रेनेज लाईन पुर्ण नवीन करण्यात येणार आहे. ड्रेनेजची वर्क आॅर्डर झाली आहे. पण ; कामाला सुरुवात व्हायची आहे. त्यामुळे सध्यस्थितीत या पुलावरील दोन्हीकडिल वाहतूक सुरु होती.
...तर फिरुन जावे लागणार...
रोज सायंकाळी रेल्वेफाटक येथे मंडई भरते. त्यामुळे न्यु शाहूपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क परिसरातील नागरिक या पुलाखालून रेल्वेफाटककडे येतात. त्यामुळे वाहतूकीची प्रचंड कोंडी असते. ड्रेनेजचे काम सुरु झाल्यास न्यु शाहूपुरी, ताराबाई पार्क आदी परिसरातील नागरिकांना रेल्वेस्टेशन गोकुळ हॉटेलमार्गे जावे लागणार आहे.
ड्रेनेज कामाची वर्क आॅर्डर झाली आहे. लवकरच कामास सुरुवात होईल.
-सुरेश कुलकर्णी,
जल अभियंता, कोल्हापूर महापालिका.