कोल्हापूर : वर्कशॉपमध्ये काम करुन बाहेर पडलेल्या केएमटी बसला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 03:38 PM2018-10-24T15:38:29+5:302018-10-24T15:40:10+5:30

वर्कशॉपमध्ये काम करुन बाहेर पडलेल्या केएमटी बसला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. नागरिक आणि चालकाच्या प्रसंगवाधानाने बस रस्त्याच्या बाजूला घेवून आग विझविण्यात आली. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मार्केट यार्ड लोणार वसाहत येथे हा प्रकार घडला.

Kolhapur: KMT who came out of work in the workshop sat on fire | कोल्हापूर : वर्कशॉपमध्ये काम करुन बाहेर पडलेल्या केएमटी बसला आग

कोल्हापूर : वर्कशॉपमध्ये काम करुन बाहेर पडलेल्या केएमटी बसला आग

ठळक मुद्दे वर्कशॉपमध्ये काम करुन बाहेर पडलेल्या केएमटी बसला आगतांत्रिक बिघाड, अग्निशामक दल घटनास्थळी

कोल्हापूर : वर्कशॉपमध्ये काम करुन बाहेर पडलेल्या केएमटी बसला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. नागरिक आणि चालकाच्या प्रसंगवाधानाने बस रस्त्याच्या बाजूला घेवून आग विझविण्यात आली. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मार्केट यार्ड लोणार वसाहत येथे हा प्रकार घडला.

अधिक माहिती अशी, तांत्रिक बिघाडामुळे केएमटी बस (एम. एच. ०९ सी. यू ०३५२) ही शिरोली एमआयडी येथील वर्कशॉपला दूरस्तीसाठी सोडली होती. दूरुस्तीचे काम झालेनंतर चालक सुनिल कांबळे, वाहक संदीप दळवी हे बुधवारी सकाळी बस शहरात घेवून येत होते. मार्केट यार्ड लोणार वसाहत येथे येताच बसमधून धूराचे लोट बाहेर पडू लागले.

स्थानिक नागरिक तुषार जाधव यांना हे दिसून येताच त्यांनी चालक कांबळे यांना सावध केले. त्यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेत इंजिनला लागलेली आग विझवली. या घटनेची माहिती समजताच घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून अग्निशामक दलाच्या जवाणांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

 

Web Title: Kolhapur: KMT who came out of work in the workshop sat on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.