Kolhapur: सीपीआर प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला, आरोपी पसार, दुचाकीस प्रवेश नाकारल्याने कृत्य

By भीमगोंड देसाई | Published: May 26, 2023 08:47 PM2023-05-26T20:47:17+5:302023-05-26T20:48:34+5:30

Crime News: कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या चाकू हल्ल्यात महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान पवन संजय कदम हा जखमी झाला. दुचाकीस प्रवेश नाकारल्याने संशयिताने धारदार चाकूने हल्ला केला.

Kolhapur: Knife attack on security guard at CPR entrance, accused Pasar, two-wheeler denied entry | Kolhapur: सीपीआर प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला, आरोपी पसार, दुचाकीस प्रवेश नाकारल्याने कृत्य

Kolhapur: सीपीआर प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला, आरोपी पसार, दुचाकीस प्रवेश नाकारल्याने कृत्य

googlenewsNext

- भीमगोंडा देसाई 
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या चाकू हल्ल्यात महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान पवन संजय कदम (वय २६, रा. इस्लामपूर, जि. सांगली) हा जखमी झाला. दुचाकीस प्रवेश नाकारल्याने संशयिताने धारदार चाकूने हल्ला केला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. हल्यानंतर संशयित आरोपी पसार झाला. तो सीपीआरमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पथकातील जवान प्रवेशद्वारासह प्रथमोपचार केंद्रात तैनात असतात. या वेळेत रुग्णांशिवाय नातेवाईक व नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. संशयित आरोपी सकाळी १० वाजता सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुचाकीवरून आला. जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला जवान कदम सह इतर सहकाऱ्यांनी त्याला अडविले. त्यानंतर तो मी कोण आहे माहीत नाही...? मला आत सोडा, असे मोठा आवाज करून सांगण्याचा प्रयत्न केला. जवानांनी त्याला जुमानले नाही. त्यावर संशयिताने दुचाकी भिंतीजवळ पार्क केली. पवनला उद्देशून तुला ठार मारतो, अशी धमकी देवून रुग्णालय आवारात असलेल्या घराच्या दिशेने पळत सुटला. दहा पंधरा मिनिटांनंतर धारदार चाकू घेवून संशयित प्रवेशद्वारावर आला. पवनसह कर्तव्य बजावत असताना त्या आराेपीने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. हल्ला चुकविण्याच्या प्रयत्नात पवनच्या हाताला इजा झाली. कमरेला तसेच पोटाजवळही दुखापत झाली. सुरक्षा रक्षकांसह काही नागरिक हल्लेखोराला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. याची प्राथमिक नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

Web Title: Kolhapur: Knife attack on security guard at CPR entrance, accused Pasar, two-wheeler denied entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.