कोल्हापूर : पिरवाडीतील हॉटेलमध्ये युवकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:11 AM2018-08-14T11:11:58+5:302018-08-14T11:13:10+5:30

पिरवाडी (ता. करवीर) येथील एका हॉटेलवर जेवायला गेलेल्या तरुणावर पूर्व वैमनस्यातून चाकूहल्ला केला. पवन सुहास सरनाईक (वय २६, रा. साई कॉलनी, आर. के. नगर, पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री घडली.

Kolhapur: A knife attack on a young man in a hotel in Pirwadi | कोल्हापूर : पिरवाडीतील हॉटेलमध्ये युवकावर चाकू हल्ला

कोल्हापूर : पिरवाडीतील हॉटेलमध्ये युवकावर चाकू हल्ला

ठळक मुद्देपिरवाडीतील हॉटेलमध्ये युवकावर चाकू हल्लाआठ जणांवर गुन्हा : पूर्व वैमनस्यातून कृत्य

कोल्हापूर : पिरवाडी (ता. करवीर) येथील एका हॉटेलवर जेवायला गेलेल्या तरुणावर पूर्व वैमनस्यातून चाकूहल्ला केला. पवन सुहास सरनाईक (वय २६, रा. साई कॉलनी, आर. के. नगर, पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री घडली.

याप्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित सूरज तिवले, आकाश डोंगळे (रा. शिवाजी पेठ), अक्षय हात्तेकर (रा. लक्ष्मीपुरी), जावेद (पूर्ण नाव नाही) यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तींवर खुनाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे समजते.

अधिक माहिती अशी, फिर्यादी पवन सरनाईक व संशयित सूरज तिवले यांच्यामध्ये २०१५ मध्ये कॉलेजमधील ट्रॅडिशनल डे च्या वादातून हाणामारी झाली होती. दोघांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. पवन सरनाईक याच्या वाढदिवसानिमित्त तो मित्रांना घेऊन पिरवाडी येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री जेवणासाठी गेला होता.

या ठिकाणी संशयित जेवणासाठी आले होते. यावेळी जेवण करीत असताना संशयित तिवले याने पूर्वीच्या वादातून पवनला तुला आता सोडत नाही, असे म्हणून चाकुने व लाकडी ओंडक्याने हल्ला केला. त्यामध्ये डोक्यात वर्मी घाव लागून पवन गंभीर जखमी झाला.

त्याच्या मित्रांनी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजताच करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमवारी रात्री उशिरा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.
 

 

Web Title: Kolhapur: A knife attack on a young man in a hotel in Pirwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.