Kolhapur-के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धा: पाटाकडीलकडून दिलबहार पराभूत, सामन्यांत तीन रेडकार्ड

By सचिन भोसले | Published: December 28, 2023 07:14 PM2023-12-28T19:14:22+5:302023-12-28T19:14:35+5:30

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ (अ) गट लीग फुटबाॅल स्पर्धेत तुषार बिश्वकर्मा, ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, आदित्य कल्लोळी यांच्या गोलच्या ...

Kolhapur K.S.A. League football competition: Dilbahar lost to Patakdil, three red cards in the match | Kolhapur-के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धा: पाटाकडीलकडून दिलबहार पराभूत, सामन्यांत तीन रेडकार्ड

Kolhapur-के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धा: पाटाकडीलकडून दिलबहार पराभूत, सामन्यांत तीन रेडकार्ड

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ (अ) गट लीग फुटबाॅल स्पर्धेत तुषार बिश्वकर्मा, ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, आदित्य कल्लोळी यांच्या गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ(अ) ने दिलबहार तालीम मंडळ (अ) चा ४-१ असा पराभव केला.

छत्रपती शाहू स्टेडीयमवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी या दोन संघात सामना झाला. सामन्याच्या सुरुवाातीपासून पाटाकडीलच्या ओंकार पाटील, प्रथमेश हेरेकर, ओंकार मोरे, नबीखान, तुषार बिश्वकर्मा, आदित्य कल्लोळी,ऋषिकेश मेथे पाटील यांनी वेगवान चाली रचत दिलबहारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यास २६ व्या मिनिटास यश आले. ओंकार मोरेने दिलेल्या पासवर तुषार बिश्वकर्माने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. 

या गोलनंतर पुन्हा २९ व्या मिनिटास डि च्या बाहेरून डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर ओंकार मोरेने अप्रतिम गोलची नोंद करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर दिलबहारकडून पवन माळी, स्वयंम साळोखे, सतेज साळोखे, रोहन दाभोळकर, सुशांत अतिग्रे यांनी आक्रमक व वेगवान चाली रचल्या. सामन्यांच्या ४० व्या मिनिटास अक्षय मेथे पाटीलने पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात धोकादायकरित्या अडविले. याबद्दल पंचांनी दिलबहार संघास पेनॅल्टी बहाल केली. यावर विष्णू विठलने गोल करीत आघाडी २-१ अशी कमी केली.

उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान आणि चुरशीचा खेळ केला. सामन्याच्या ६८ व्या मिनिटास पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकरने मैदानी गोल करीत संघाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. त्यांनतर ७२ व्या मिनिटास पाटाकडीलच्या नबीखानने दिलेल्या पासवर आदित्य कल्लोळीने गोलची नोंद करीत संघाला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. याच गोल संख्येवर जिंकला. सामन्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या नेतृत्वाखाली तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तिघांना रेडकार्ड

सामन्यांत अखिलाडीवृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल ऋषिकेश मेथे पाटील (पाटाकडील) रोहन दाभोळकर व सुमित घाटगे (दिलबहार) यास दोन यलो झाल्याने रेडकार्ड पंचांनी देत मैदानाबाहेर काढले.

आजचा सामना

दु. १.०० वा. संध्यामठ तरूण मंंडळ विरुद्ध सोल्जर्स ग्रुप
(दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ व संयुक्त जुना बुधवार यांच्या सामना होणार होता. मात्र खंडोबा संघातील चार खेळाडू आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा साठी शिवाजी विद्यापीठ संघात निवडले गेले आहेत. त्यामुळे नियमानुसार हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे)

Web Title: Kolhapur K.S.A. League football competition: Dilbahar lost to Patakdil, three red cards in the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.