कोल्हापूर : फुलेवाडी जकात नाक्यानजीक जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:10 PM2018-10-20T14:10:50+5:302018-10-20T14:14:51+5:30
कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य मार्गावर फुलेवाडी जकात नाका येथे शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे रस्त्यावर पाणीच पाणी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. लाखो लिटर पाणी रस्त्यावरुन वाहून जात असून गेले आठ दिवस ही परिस्थिती आहे. महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य मार्गावर फुलेवाडी जकात नाका येथे शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे रस्त्यावर पाणीचपाणी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. लाखो लिटर पाणी रस्त्यावरुन वाहून जात असून गेले आठ दिवस ही परिस्थिती आहे. महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यात फुलेवाडी जकात नाका येथे मुख्य रस्त्यावर शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे दुरुस्ती काम महापालिका प्रशासनाच्यावीने करण्यात आले आहे. पण दुरुस्तीकामानंतर या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे जकात नाका परिसरात रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत आहेत.
फुलेवाडी जकात नाका परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी
त्यामुळे संपूर्ण रस्ता खराब झाला असून रस्ता खड्डेमय झाला आहे. सुमारे आठवडाभर ही अवस्था असून याकडे महापालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य मार्गावर फुलेवाडी जकात नाका परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
फुलेवाडी जकात नाका परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने रोज किमान आठवडाभर वाहतुकची कोंडी होऊन सुमारे दोन किमीपर्यत वाहनांच्या रांगा लागत आहेत.
या रस्त्यावर बहुतांशी अवजड वाहतुक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच रस्त्यावर पाण्याने भरलेल्या खड्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पश्चिमेला बालिंगापर्यत तर पूर्वेला रंकाळा चौपाटीपर्यत दोन्हीही बाजूला किमान दोन किमी पर्यतच्या लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहनधारक तसेच नागरीकांतून महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. गेले आठवडाभर ही अवस्था असून त्याकडे अधिकाºयांचे अक्षम दर्लक्ष होत आहे.
एकिकडे रास्ता रोको, दुसरीकडे रस्त्यावर पाणी
शहरात पाणी भरपूर प्रमाणात असतानाही फक्त नियोजनाअभावी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी मिळत नसल्याने रास्ता रोको सारखी आंदोलन होत असताना मात्र फुलेवाडी जकात नाका परिसरात रस्त्यावर लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून परिसरात मोठ्या प्रमाणात तुंबून राहीले आहे.