कोल्हापूर : कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:42 PM2018-04-13T17:42:18+5:302018-04-13T17:42:18+5:30

कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या, अशी मागणी कोल्हापुरात शुक्रवारी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करून शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मिरजकर तिकटी येथे निदर्शने करण्यात आली.

Kolhapur: Let the accused be hanged in the Kadua-Udna torture case | कोल्हापूर : कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या

कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्यावी, मागणीसाठी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मिरजकर तिकटी येथे निदर्शने केली. निदर्शनात आदिल फरास, अमोल माने, जयकुमार शिंदे आदींचा सहभाग होता.

Next
ठळक मुद्दे कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या‘राष्ट्रवादी युवक’ची कोल्हापुरात निदर्शने : मोदी सरकारचा निषेध

कोल्हापूर : कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या, अशी मागणी कोल्हापुरात शुक्रवारी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करून शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मिरजकर तिकटी येथे निदर्शने करण्यात आली.

कठुआ येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सलग पाच दिवस अत्याचार करून खून करण्यात आला तसेच उनाव येथेही तरुणीवर एका आमदाराने अत्याचार केला तसेच तिच्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला पण, तरीही आरोपींना अटक झालेली नाही. भाजप सरकारच्या काळात लेकी-सुना सुरक्षित नाहीत. या पीडितांना न्याय मिळावा व आरोपींना फाशी व्हावी, अशी मागणी केली.

माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. निदर्शनात माजी नगरसेवक अमोल माने, शहराध्यक्ष युवराज साळोखे, कार्याध्यक्ष किशोर माने, दक्षिण अध्यक्ष प्रमोद पवार, जयकुमार शिंदे, परिक्षित पन्हाळकर, सचिन लोहार, रोहित गवंडी, विनोद जाधव, बबलू फाले, अंजूम गडकरी, असिफ शेख, मोहसीन पठाण, सुशांत पवार, रणजित कदम, बाळू घडशी आदींचा सहभाग होता.

 

 

Web Title: Kolhapur: Let the accused be hanged in the Kadua-Udna torture case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.