कोल्हापूर : जैन समाजाच्या शिक्षणसंस्थांचे प्रश्न मार्गी लावू : अराफत शेख; निवेदन सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:43 AM2018-11-16T11:43:09+5:302018-11-16T11:44:13+5:30
जैन समाजाच्या शिक्षणसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली जाईल. त्याद्वारे हे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिले.
कोल्हापूर : जैन समाजाच्या शिक्षणसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली जाईल. त्याद्वारे हे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिले.
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष शेख हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील जैन समाजाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. यावेळी आॅल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जैन शिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी असलेल्या योजनांमधील औपचारिक टक्केवारीची अट रद्द करणे; अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शिक्षण संस्थांना घटनात्मक अधिकार असूनही या तरतुदीशी विसंगत परिपत्रकामुळे येणाºया अडचणी सांगितल्या. अल्पसंख्याक मंत्रालयाच्या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये येणाºया अडचणी दूर करण्याची मागणी केली.
या बैठकीत आचार्य देशभूषण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. के. ए. कापसे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष डी. ए. पाटील, बाहुबली विद्यापीठाचे महावीर लठ्ठे, प्रा. सुषमा रोटे यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करून निवेदने सादर केली. यावर आयोगाचे अध्यक्ष शेख यांनी माझ्या पहिल्या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूरमधून करीत आहे. या बैठकीतील जैन समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.