Kolhapur: पट्टणकोडोलीतील शिवरायांचा पुतळा तसाच राहू द्या, एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:33 IST2025-04-02T13:32:49+5:302025-04-02T13:33:11+5:30

अनिल बिरांजे पट्टणकोडोली: एसटी स्टँड येथे बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तसाच राहू द्या. फक्त तो ...

Kolhapur: Let the statue of Shivaji Maharaj in Pattankodoli remain as it is, Deputy Chief Minister Eknath Shinde instructions | Kolhapur: पट्टणकोडोलीतील शिवरायांचा पुतळा तसाच राहू द्या, एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना

Kolhapur: पट्टणकोडोलीतील शिवरायांचा पुतळा तसाच राहू द्या, एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना

अनिल बिरांजे

पट्टणकोडोली: एसटी स्टँड येथे बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तसाच राहू द्या. फक्त तो झाकून ठेवण्यात यावा आपण त्याची परवानगी लवकरात लवकर देऊ, त्यानंतर पुतळा खुला करण्यात यावा अशा सूचना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती मिळाली.

पट्टणकोडोली येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जुना एसटी स्टँड येथे बसविण्यात आला होता. हा पुतळा विना परवाना असल्याने तो हटवण्यासाठी इचलकरंजीचे डीवायएसपी समीर साळवे यांच्यासह मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. तर पुतळा एक इंच सुद्धा हलवू  देणार नाही, म्हणत साधारणता ४०० ते ५०० मावळे पुतळ्याजवळ बसून आहेत. गावात सध्या तणावाचे वातावरण असून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले आहे.

या ठिकाणी इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यासह दोनशे पोलीस फाटा तैनात करण्यात आल्याने गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तो पुतळा आहे तसाच राहू द्या. फक्त तो झाकून ठेवण्यात यावा अशा सूचना केल्याची माहिती मिळाली.

Web Title: Kolhapur: Let the statue of Shivaji Maharaj in Pattankodoli remain as it is, Deputy Chief Minister Eknath Shinde instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.