कोल्हापूर : ‘फुटबॉल’साठी एक परिपूर्ण मैदान तयार करू देवू : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:34 PM2018-10-20T13:34:32+5:302018-10-20T13:40:13+5:30
कोल्हापूरच्या फुटबॉलला शास्त्रोक्त दिशा देण्यासाठी शहरातील कुठल्याही पाच मैदानांपैकी एक मैदान केवळ फुटबॉल खेळासाठी अद्यायवत करु देवू , असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. हॉटेल सयाजी येथे शुक्रवारी (१९) रात्री ‘फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी’या व्यावसाईक फुटबॉल संघाच्या बोधचिन्ह अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर : कोल्हापूरच्याफुटबॉलला शास्त्रोक्त दिशा देण्यासाठी शहरातील कुठल्याही पाच मैदानांपैकी एक मैदान केवळ फुटबॉल खेळासाठी अद्यायवत करु देवू , असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. हॉटेल सयाजी येथे शुक्रवारी (१९) रात्री ‘फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी’या व्यावसाईक फुटबॉल संघाच्या बोधचिन्ह अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या क्रीडा धोरणांमुळे कोल्हापूरही खेळाबाबत देशाच्या नकाशावर येवू लागले आहे. येत्या आॅलंपिक स्पर्धात कोल्हापूरचे १२ जण पदक आणतील. एखादी स्पर्धा आयोजित करणे आणि व्यावसाईक संघ निर्माण करणे फरक आहे. त्यात आयलीग सारखा संघ करणे कठीण बाब आहे.
त्यात कोल्हापूरच्या फुटबॉलला नवी दिशा मिळावी म्हणून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी स्तुत्य काम केले आहे. यासाठी लागणारे मैदान महत्वाचे आहे. त्यामुळे कोल्हापूरातील पाच मैदाने आहेत. त्यातील एक फुटबॉलसाठी परिपूर्ण अद्यावत मैदान डिसेंबर अखेर करुन देवू. यासाठी राज्य शासनाचा निधी व उद्योजकांचा सीएसआर निधीही देवू.
विफाचे उपाध्यक्ष व के.एस.ए.अध्यक्ष मालोजीराजे म्हणाले, ’फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी ’ च्या रुपाने कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात सोनेरी पान लिहण्यासारखा दिवस आहे. फुटबॉल मध्ये गुणात्मक वाढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रास्ताविकात चंद्रकांत जाधव म्हणाले, लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळ याकरीता क्रीडा विद्यापीठ बनवण्याचा मानस व्यक्त केला. १३ व १५ वर्षाखालील आयलीग स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. रविवारी एफसी कोल्हापूर सिटीच्या महिला संघाचा कुपरेजवर पहिला सामना आहे. त्यामुळे बोधचिन्हाचे अनावरण केले. आभार उपाध्यक्ष नगरसेवक संभाजी जाधव यांनी मानले.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, योगेश कुलकर्णी, अरुण नरके, संजय शेटे, राजू पाटील, उमेश चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.