कोल्हापूर लोकसभा निवडणूक २०१९ : कोण जिंकेल कोल्हापूर; संजय मंडलिक की धनंजय महाडीक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:11 AM2019-05-23T09:11:32+5:302019-05-23T10:21:08+5:30
पाचवी फेरी अखेर : कोल्हापूर मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक ६०३९९ नी आघाडीवर. उत्तर करवीर अजुन फेरी बाकी
कोल्हापूर: २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदी लाटेत कोल्हापूर मतदार संघात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनीच बाजी मारली होती. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे धनंजय महाडीक हे निवडून आले होते. त्यांनी संजय मंडलिक यांचा ३३, २५९ मतांनी पराभव केला होता. महाडिक यांना एकूण ६ लाख ७ हजार ६६५ इतकी मत मिळाली होती. यावेळीही या मतदार संघात दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. एकमेकांमधील लढतीची ही चुरस त्यातच आमंच ठरलंयची पडलेली अधिक भर यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची झालेली आहे. यामुळे प. महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.
यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले असून एका बाजूला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सर्वस्वी ताकद व केलेला प्रचार तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली ही प्रतिष्ठेची निवडणूक त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दोन बड्या नेत्यांच्या लढाईत कार्यकर्त्यांनीही आपली सर्वस्वी ईर्शा पणाला लावली असल्याने ही निवडणूक स्वत: बरोबरच गावपातळीच्या कार्यकर्त्यांपर्यंत लक्षवेधी ठरली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली इतक्या फेºया झाल्या असून यात कोल्हापूर मतदार संघातील, कोल्हापूर मतदार संघातून पहिल्या फेरीत शिवसेनेचे संजय मंडलिक 19505 ने आघाडीवर आहे.
गेल्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना ६ लाख ७ हजार ६६५ इतकी मत मिळालील होती तर संजय मंडलिक यांना ५ लाख ७४ हजार ४०६ इतकी मत मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत एकूण मतदान १८ लाख ६८ हजार २३५ इतके मतदान झाले असून . त्यामुळे मतमोजणीची वाढलेली धाकधुक आणि उन्हाचा चढता पारा यामुळे घामेघुम झालेले नेते व कार्यकर्त्यांना काही तासातच कशी व कोणाच्या बाजूने दिलासा देणारी ठरेल ही वेळ ठरवेल.