Kolhapur lok sabha result 2024: शाहू छत्रपती यांची आघाडी विजयाच्या दिशेने, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु
By विश्वास पाटील | Published: June 4, 2024 12:29 PM2024-06-04T12:29:09+5:302024-06-04T12:29:58+5:30
Kolhapur lok sabha result 2024: शाहू छत्रपती यांची आघाडी विजयाच्या दिशेने, कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु
कोल्हापूर : Kolhapur lok sabha result 2024: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती (shahu chhatrapati) हे दुपारी बारा वाजेपर्यंत मोजलेल्या सातव्या फेरीअखेर ४६ हजार ५७१ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांची ही आघाडी विजयाच्या दिशेने जाणारी आहे. शिंदेसेनेचे खासदार संजय मंडलिक हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. मंडलिक पोस्टल मतापासूनच मागे राहिले आहेत. नवीन राजवाड्यासह शहरभर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.
पाचव्या फेरीअखेर एकूण ३ लाख ९२ हजार ८११ मते मोजली आहेत. त्यातील शाहू छत्रपती २ लाख १४ हजार ०७० तर मंडलिक यांना १ लाख ७७ हजार ४९९ मते मिळाली आहेत. या मतदार संघात रिंगणात २३ उमेदवार असले तरी थेट दुरंगीच लढत झाली आहे. सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये शाहू छत्रपती यांना कोल्हापूर उत्तर, करवीर आणि राधानगरी विधानसभा मतदार संघातून चांगले मताधिक्क्य मिळत आहे. मंडलिक यांना कागल, चंदगड आणि कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून मताधिक्क्य मिळत आहे परंतू ते फार कमी आहे.
मंडलिक यांची भिस्त कागल, राधानगरी आणि चंदगड विधानसभा मतदार संघावर होती परंतू मातब्बर नेते महायुतीकडे असूनही या मतदार संघात त्यांना अपेक्षित मते मिळत नसल्याचे दिसत आहे. उलट राधानगरीत शाहू छत्रपती यांना जास्त पाठबळ मिळाल्याचे आकडे सांगत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचा मतदार संघ असलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये शहरी भागात काँग्रेसला कमी मतदान मिळाले. पण ग्रामीण भागाच्या मतमोजणीत पुन्हा शाहू छत्रपती यांना मताधिक्कय मिळाले आहे.