कोल्हापूर : लोकमत महामॅरेथॉन; आपला सहभाग आजच नोंदवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 04:57 PM2018-12-19T16:57:08+5:302018-12-19T17:02:40+5:30

फॅमिली रन व फन रनमध्ये थोडे धावण्याचा व थोडे स्पर्धा मार्गावर आयोजित केलेल्या मनोरंजनाचा लाभ घेता येणार आहे. यासह सहभागी होणाऱ्यांना सन्मानचिन्ह, गुडीबॅग, टी-शर्ट, ब्रेकफास्ट आणि बरेच काही मिळणार आहे. आपण केवळ लवकरात लवकर नोंदणी करा.

Kolhapur: Lokmat Mahamarethan; Report your participation today! | कोल्हापूर : लोकमत महामॅरेथॉन; आपला सहभाग आजच नोंदवा!

कोल्हापूर : लोकमत महामॅरेथॉन; आपला सहभाग आजच नोंदवा!

Next
ठळक मुद्देलोकमत महामॅरेथॉन; आपला सहभाग आजच नोंदवा! फॅमिली व फन रनमध्ये न धावणारेही सहभागी होऊ शकतात,

कोल्हापूर : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सहा जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहेत, त्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’च्या थरारामध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकता. फॅमिली रन व फन रनमध्ये थोडे धावण्याचा व थोडे स्पर्धा मार्गावर आयोजित केलेल्या मनोरंजनाचा लाभ घेता येणार आहे. यासह सहभागी होणाऱ्यांना सन्मानचिन्ह, गुडीबॅग, टी-शर्ट, ब्रेकफास्ट आणि बरेच काही मिळणार आहे. आपण केवळ लवकरात लवकर नोंदणी करा.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन असलेली ही महामॅरेथॉन स्पर्धा जिंकण्याच्या इराद्यानेच अनेक व्यावसायिक व हौशी धावपटू गेल्या महिन्याभरापासून तयारी करीत आहेत. कोल्हापूर ही क्रीडानगरीची खाण आहे. यात फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, खो-खो, कराटे, नेमबाजी, हॉकी... अशा एक ना अनेक खेळांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर किमान एक तरी खेळाडू सद्य:स्थितीत चमकत आहे.

या सर्वांना स्वत:ला तंदुरुस्त राहण्यासाठी धावावे लागते. हाही सरावाचाच एक भाग आहे. यातून तंदुरुस्ती राहते. तिच्यासाठीच तुम्ही-आम्हीही सातत्याने धडपडत असतो. मग ती तंदुरुस्ती कशी मिळते असा प्रश्नही उपस्थित होतो. याकरिता जाणकार सांगतात, सकाळी उठल्यानंतर किमान तीन किंवा पाच किलोमीटर अंतर दररोज धावावे. मग त्या धावण्यातून तंदुरुस्तीबरोबरच मनाचे स्वास्थ्यही मिळते. यासह धावण्यातून करिअर करण्याची संधीही आज उपलब्ध झाली आहे.

नियमित सराव केल्यास जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर केवळ अ‍ॅथलेटिक्स या प्रकारात करिअर करता येते. यातूनच केंद्र सरकारच्या रेल्वे, पोलीस, लष्कर, निमलष्कर, आदी सेवांमध्ये भरतीसुद्धा होता येते. मॅरेथॉनमध्ये धावण्याबरोबरच सहभागी झालेल्या धावपटूंचा उत्साह वाढविणे हासुद्धा मॅरेथॉनचाच महत्त्वपूर्ण एक भाग आहे. तरी न धावणारेही कुटुंबासह फॅमिली रन, तर मित्र-मित्र ‘फन रन’मध्ये सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद लुटू शकतात. नोंदणीसाठी केवळ मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे त्वरा करा; हा आनंद आता नाही तर कधीच नाही!

नवोदितांना ‘महामॅरेथॉन’ व्यासपीठ

आजच्या धावपळीच्या युगात बिनपैशांचा व्यायाम म्हणून धावणे सर्वोत्तम आहे. धावण्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. उत्साह दिवसभर ओसंडून वाहतो. आजकाल केवळ मोबाईलच्या दुनियेत पिढीच्या पिढी बरबाद होऊ लागली आहे. यातून आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवत आहेत.

लहान मुलांचे खेळणे म्हणजे मोबाईलवरील ‘गेम’ हेच खेळणे राहिले आहे. त्यांना मैदानी खेळांची आवडच राहिलेली नाही. शरीराला थकविणारा खेळ न खेळल्यास शरीर तंदुरुस्त राहत नाही. त्यातून लहान वयातच अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. हे न होण्यासाठी कुठल्याही खेळाबरोबरच धावणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यात विनासाधन असा खेळ म्हणजे अ‍ॅथलेटिक्स आहे.

तंत्रशुद्ध धावण्याचा सराव केल्यास शरीर तंदुुरुस्तीबरोबरच स्पर्धेचीही तयारी होते. याकरिता तज्ज्ञही उपलब्ध आहेत. या खेळातूनच करिअर करण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. ‘लोकमत’ महामॅरेथॉनमुळे तुम्हालासुद्धा एक सुवर्णसंधी मिळत आहे. तिचा लाभ घ्या.

 

मीही या स्पर्धेत सहभागी होऊन धावणार आहेच. याशिवाय तुमच्यासारख्या नवोदितांना मी मॅरेथॉन ट्रेनर म्हणून काही टिप्सही देणार आहे. त्याचा लाभ तुम्हाला ही महामॅरेथॉन संपल्यानंतरही आयुष्यभरासाठी होईल. तुम्हीही सहभागी होऊन या स्पर्धेत धावा. ‘लोकमत’ हे व्यासपीठ नवोदितांसाठी संधी नव्हे तर पर्वणीच देणारे आहे. मॅरेथॉनमध्ये यशस्वी रन करण्यासाठी सरावपूर्व तयारीकरिता मी मेरी वेदर ग्राउंड येथे रोज सकाळी सात वाजता उपलब्ध आहे.
- सुरेश चेचर ,
मॅरेथॉन ट्रेनर



महामॅरेथॉनसाठी उद्यापर्यंतच नोंदणी

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धुमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. कोल्हापुरात गेल्या वर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत, या हेतूने यावर्षी आयोजित केलेली ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाऱ्यासाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटर अंतराची असणार आहे.

ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत उद्या, दि. २० डिसेंबरपर्यंत आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क

या महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.
 

 

Web Title: Kolhapur: Lokmat Mahamarethan; Report your participation today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.