कोल्हापूर : मृत्यूच्या डावाने केले निलेशला अखेर पराभूत, कुस्ती शौकिनांच्या जीवाला चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 05:22 PM2018-04-06T17:22:51+5:302018-04-06T17:22:51+5:30

पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे गावामध्ये यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानामध्ये पैलवानांच्या शड्डूच्या आवाजाने मैदान रंगात आले असतानाच एका कुस्ती दरम्यान बादेवाडीचा १९ वर्षाचा उमदा पैलवान निलेश कणदुरकर हा एक चाक डावावर पैलवान चकला अनं आयुष्याच्या मैदानामध्ये मृत्यूने टाकलेल्या डावात पराभूत झाला.

Kolhapur: Losing the death of Nilesh to death at the end | कोल्हापूर : मृत्यूच्या डावाने केले निलेशला अखेर पराभूत, कुस्ती शौकिनांच्या जीवाला चटका

कोल्हापूर : मृत्यूच्या डावाने केले निलेशला अखेर पराभूत, कुस्ती शौकिनांच्या जीवाला चटका

googlenewsNext
ठळक मुद्देमृत्यूच्या डावाने केले निलेशला अखेर पराभूतशेवटची कुस्ती अनिर्णीतच, कुस्ती शौकिनांच्या जीवाला चटका

विक्रम पाटील

करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे गावामध्ये यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानामध्ये पैलवानांच्या शड्डूच्या आवाजाने मैदान रंगात आले असतानाच एका कुस्ती दरम्यान बादेवाडीचा १९ वर्षाचा उमदा पैलवान निलेश कणदुरकर हा एक चाक डावावर पैलवान चकला अनं आयुष्याच्या मैदानामध्ये मृत्यूने टाकलेल्या डावात पराभूत झाला.

निलेश याला वाडवडीलांच्या पासूनची कुस्तीची परंपरा असल्यामुळे आजोबासह वडील विठ्ठल कणदुरकर हे परिसरात नावलौकीक असलेले मल्ल म्हणून ओळख. घरची एक एकर डोंगराळ शेती असताना देखील गरीबीची तमा न बाळगता त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांनी कुस्तीत नाव करुन महाराषट्र केसरी बनावे म्हणून गावात एका ठिकाणी छोटासा आखडा बनवला व आपल्या मुलाबरोबर गावातील वीस मुलांना प्रशिक्षण देऊन परिसरातील मैदाने गाजवण्यास सुरवात केली. त्यातून एक पिळदार शरीरयष्टीच्या व चपळतेच्या जोरावर हिरा चमकू लागला, तो म्हणजे उमदा पैलवान निलेश कणदुरकर.

पुढे कुस्तीच्या जोरावर आपले नाव करेल या आशेवर त्याच्या वडिलांनी पोटाला चिमटा देत निलेशला तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून वारणानगर येथील कुस्ती संकुलात भरती केले. अनं वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे निलेशची यशाची घोडदौडही सुरू झाली. तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये निलेशने प्रथम क्रमांक मिळवून घरच्यांच्या व नातेवाईकांच्या अशा पल्लवीत केल्या अन आपल्या परिसरात आपल्या कलेचा दबदबा निर्माण करण्यासाठी या हंगामातील वडीलांच्या साथीने यात्रेनिमित्त भरवण्यात येणारी मैदाने करण्यास सुरवात केली.

आपले अखेरचेच मैदान आहे हे न उमगलेल्या बांदिवडे येथील कुस्ती मैदानामध्ये समोरचा मल्ल तगडा असताना देखील वडीलांचा शब्द प्रमाण माणून प्रतिस्पर्धाच्या हातात हात मिळवला. आपल्या नेहमीच्या शैलीत शरीरयष्टीचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी पैलवानावर खणखणीत आवाजात निलेशने अखेरचा शड्डू ठोकला.

परिसरामध्ये कणदुरकरांच्या पोरांची कुस्ती म्हणजे कुस्ती शौकीनांना पर्वणीच असल्यामुळे सर्वांचे डोळे या कुस्तीकडे खेळून राहिले होते. डाव प्रतिडावांचा सामना चालू असताना निलेश नेमका एकचाक डाव परतवून लावण्याच्या प्रयत्नात मानेवर पडला अनं मणक्यासह स्पायनल कॉड मोडल्यामुळे मैदानात गंभीर अवस्थेत निपचित पडून राहिला.

पंचांच्या लक्षात येताच त्याला तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले अनं निलेशची जीवन-मृत्यूशी झुंज सुरु झाली. कोल्हापूर येथील खाागी रुग्णालयात उपचाराला साथ मिळत नसल्यामुळे त्याला कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले, परंतू सहा दिवस मृत्यूच्या मैदानात झुंज देणाऱ्या व आयुष्याच्या शेवटच्या कुस्तीतही जमिनाला पाठ न टेकणाऱ्या निलेशला मृत्यूच्या मैदानात मात्र पाठ टेकावी लागली.

शुक्रवारी पहाटे साडे चार वाजता मृत्यूसमोर त्याला पराभव पत्करावा लागला. त्याच्या मृत्यूमुळे जगात कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर नगरीसह संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमी शोकसागरात बुडाले.

त्याच्या राहत्या छोट्याशा बादेवाडी गावात नम्र व मनमिळावू स्वभावामुळे पैलवान म्हणून वेगळी ओळख असलेल्या निलेशच्या मृत्यूने आबालवृद्धापर्यंत सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओल्या केल्या तर त्याच्या आईवडीलासह निलेशच्या मित्रांनी फोडलेला हंबरडा गहिवरुन टाकणारा होता. लक्ष्मणासारखा सहा दिवस त्याचा भाऊ पैलवान सुहास निलेशच्या उशाशी बसून होता, त्याची अवस्था सांगता न येण्यासारखी होती.

Web Title: Kolhapur: Losing the death of Nilesh to death at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.