कोल्हापूर : चुयेतील मधुबाला मगदूमची राष्ट्रीय भरारी, बालविज्ञान परिषदेत बाजी; गाईच्या दूध उत्पादनाबाबत प्रकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:33 PM2018-01-01T19:33:43+5:302018-01-01T19:42:32+5:30
चुये (ता. करवीर) येथील एसएचपी हायस्कूल आणि आनंदरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी मधुबाला मारुती मगदूम हिने राष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या २५ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेतील उत्कृष्ट पंधरा प्रकल्पांमध्ये तिने सादर केलेल्या प्रकल्पाची निवड झाली आहे. तिने या परिषदेत ‘ओझोलाचा गाईच्या दूध उत्पादनावर परिणाम’ हा प्रकल्प सादर केला.
कोल्हापूर : चुये (ता. करवीर) येथील एसएचपी हायस्कूल आणि आनंदरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी मधुबाला मारुती मगदूम हिने राष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या २५ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतील उत्कृष्ट पंधरा प्रकल्पांमध्ये तिने सादर केलेल्या प्रकल्पाची निवड झाली आहे. तिने या परिषदेत ‘ओझोलाचा गाईच्या दूध उत्पादनावर परिणाम’ हा प्रकल्प सादर केला.
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे अहमदाबाद येथील सायन्स सिटीमध्ये दि. २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय बालविज्ञान परिषद घेण्यात आली. यात देशभरातून विविध ५८८ प्रकल्प सादर झाले. यातील उत्कृष्ट १५ प्रकल्पांची निवड करण्यात आली. यामध्ये चुये (ता. करवीर) येथील मधुबाला मगदूम हिच्या प्रकल्पाची निवड झाली.
तिने ‘टू स्टडी द इफेक्ट आॅफ ओझोला आॅन प्रॉडक्शन आॅफ काऊस मिल्क’ हा प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाच्या संशोधनात तिच्यासह प्रतिक्षा रघुनाथ पाटील, आकांक्षा सदाशिव पाटील, रेश्मा राजेंद्र पाटील, सानिका शहाजी पाटील यांचा समावेश होता. त्यांना बालविज्ञान परिषदेचे राज्य समन्वयक एम. बी. मुडबिद्रीकर, यु. जी. वाकुरे, डॉ. मस्के यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी महाराष्ट्रातून ३० प्रकल्प सादर झाले. यात ‘अझोला’सह तीन प्रकल्पांचा समावेश होता. त्यात स. म. लोहिया स्कूलच्या विरेंद्रसिंह नरेंद्र जाधव याने कृत्रिम रंगाचा शरीरावर होणारा परिणाम अभ्यासणे आणि बाहुबलीतील एम. जी. शहा विद्यामंदिरच्या रिद्धी शैलेश चव्हाण हिने ‘कृषी कचऱ्याचे व्यवस्थापन’ हा प्रकल्प सादर असल्याचे मुडबिद्रीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, राष्ट्रीय परिषदेतील यशामुळे कोल्हापूरचा नावलौकीक झाला आहे. उत्कृष्ट पंधरा प्रकल्पातील सहभागामुळे मधुबाला हिला
काय आहे अझोला
अझोला हे पशुखाद्य आहे. ते गाईचे दूध उत्पादन आणि गुणवत्ता वाढविते. या अझोलामध्ये उच्च प्रोटीन, आवश्यक अमिनो अॅसिडस्, शरीरवाढीसाठी आवश्यक असणारी खनिजे जसे की, कॉपर, फेरस, मॅग्नशिअम, पोटॅशिअम आदी आणि ड्रायमॅटर बेसिसवर २५ ते ३० टक्के प्रथिने आहेत. जे दूधाचे उत्पादन वाढवितात. इतर खाद्यांपेक्षा ते पौष्टिक आणि स्वस्त असल्याचे मधुबाला हिने सांगितले.
राष्ट्रीय पातळीवरील यशाचा मोठा आनंद
करवीर तालुक्यातील दूध उत्पादन चांगले आहे. ते अधिक वाढविण्याच्या उद्देशाने मी आणि माझ्या अन्य विद्यार्थीनी मैत्रिणींनी एखादे पशुखाद्य तयार करण्याचे संशोधन सुरू केले. त्यातून अझोलाची निर्मिती झाल्याचे मधुबाला हिने सांगितले.
ती म्हणाली, या पशुखाद्याची आम्ही चुये येथील गायींवर चाचणी घेतली. यातून दूध उत्पादनात वाढल्याचे दिसून आले. आमचा हे संशोधन प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट ठरल्याचा खूप आनंद होत आहे. माझ्या यशात आई-वडील, शिक्षक, एम. बी. मुडबिद्रीकर यांचा मोठा वाटा आहे. आम्ही या संशोधनाची व्याप्ती वाढवून महिला आणि कुपोषितांसाठी चांगले खाद्य तयार करण्याचे ध्येय आहे.