कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे पाच कामगार दाम्पत्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 04:23 PM2018-07-14T16:23:02+5:302018-07-14T16:27:55+5:30
एका अपत्यावर व दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्याबद्दल पाच सुखी कामगार दाम्पत्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कोल्हापूर : एका अपत्यावर व दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्याबद्दल पाच सुखी कामगार दाम्पत्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राजारामपुरी ललित कला भवन येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे दि कमर्शियल बँकेचे संचालक अमरसिंह शेळके तर सरोज आयर्न इंडस्ट्रिज प्रशासन विभागाचे प्रमुख प्रकाश जाधव व अंनिसच्या कार्याध्यक्षा सीमा पाटील आदी उपस्थित होते.
अमरसिंह शेळके म्हणाले, या दाम्पत्याने औद्योगिक कामगारांसमोर आदर्श ठेवला आहे. कुटुंबाचा आर्थिक समतोल हा कुटूंबातील सदस्यांच्या संख्येवरती अवलंबून आहे. छोटे कुटूंब आर्थिकदृष्टया सबळ असते,अशी अनेक उदाहरण पाहायला मिळतील.
याप्रसंगी मुदाळतिट्टा येथील गुंडाप्पा कांबळे, वीरशैव बॅकेचे मनोहर नकाते , एल्कॉम कंपनीचे संदीप तिरपणे, टेस्सीटयुरा माँटी कंपनीचे संदीप काशीद व वारणा दूध संघाचे नितीन पाटील यांचा सपत्नीक यांचा पाच हजार रुपयांचा धनादेश, शाल व श्रीफळ, गृहोपयोगी साहित्य, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संघसेन जगतकर यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी चंद्रकांत घारगे, राजेंद्र निकम, दीपक गावराखे, शाहिन चौगले, विद्या कांबळे , शोभा पोरे, स्वाती रणखांबे, सुचित्रा चव्हाण, स्वाती वायचळ, विजय खराडे, अशोक कौलगी, सुजाता बुधले, मंगल बेळगांवकर, श्वेतल सुतार आदी उपस्थित होते.