कोल्हापूर : सीपीआरमध्ये थॅलेसेमियाची औषधे लवकरच उपलब्ध करु :सुधीर नणंदकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 03:44 PM2018-10-22T15:44:24+5:302018-10-22T15:46:22+5:30
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) थॅलेसेमिया रुग्णांची औषधे लवकरच उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सोमवारी येथे दिले.
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) थॅलेसेमिया रुग्णांची औषधे लवकरच उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सोमवारी येथे दिले.
कोल्हापूर जिल्हा थॅलेसेमिया निर्मुलन समितीच्या शिष्टमंडळाने थॅलेसेमिया रुग्णांना औषधांचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यासाठी रुग्णांच्या पालकांना सातारा येथील रुग्णालयातून औषधे घेऊन यावे लागतात असल्याचे समितीचे अध्यक्ष धनंजय नामजोशी यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर जिल्हयासह परजिल्हयातून थॅलेसेमिया रुग्णांसाठी उपचाराबाबतचे कार्य सीपीआरमध्ये सुरु आहे. या रुग्णांना आवश्यक असणारी काही औषधे आहेत , ही औषधे जर वेळेत दिली नाहीत तर हे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. पण ; सीपीआरमधून औषधांचा पुरवठा होत नाही.
याबाबत थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांनी समितीबरोबर चर्चा केली. गोळ्या मिळत नसल्यामुळे रुग्णांनचा याचा त्रास होतो. फेरिटीनचे प्रमाण वाढत चालले आहे. एच.बी.चे प्रमाण कमी होत आहे. त्याचबरोबर ही औषध सातारा येथील रुग्णालयातून पालक घेऊन येतात. त्यामुळे नियमितपणे रुग्णालयात औषधे उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
दरम्यान, सीपीआरमध्ये स्वतंत्र थॅलेसेमिया रुग्णांसाठी वॉर्ड सुरु केल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. नणंदकर व डॉ. वरुण बाफना यांचा यावेळी समितीतर्फे सत्कार करण्यात आला.शिष्टमंडळात उपाध्यक्ष रणजित जाधव,अमोल निलाले,रुपाली कुरणे, गोपाळ कुंभार, अनिकेत जाधव,रिना तुरे, अभिजीत बुधले,सुर्यकांत धनवडे यांच्यासह थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांचा सहभाग होता.