कोल्हापूर : मेकर ग्रुप कंपनी फसवणूकीबाबत मागे न हटण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:50 PM2018-12-07T16:50:06+5:302018-12-07T16:54:02+5:30

मेकर ग्रुप कंपनीकडून झालेल्या फसवूणकीबाबत कोणत्याही स्थितीत मागे न हटण्याचा निर्धार कोल्हापूरात विरोधी कृती समितीने शुक्रवारी केला.

Kolhapur: The maker group is a firm decision not to go back on phishing | कोल्हापूर : मेकर ग्रुप कंपनी फसवणूकीबाबत मागे न हटण्याचा निर्धार

कोल्हापूर : मेकर ग्रुप कंपनी फसवणूकीबाबत मागे न हटण्याचा निर्धार

googlenewsNext
ठळक मुद्देमेकर ग्रुप कंपनी फसवणूकीबाबत मागे न हटण्याचा निर्धारविरोधी कृती समितीचा मेळावा : पोलिसात तक्रार

कोल्हापूर : मेकर ग्रुप कंपनीकडून झालेल्या फसवूणकीबाबत कोणत्याही स्थितीत मागे न हटण्याचा निर्धार कोल्हापूरात विरोधी कृती समितीने शुक्रवारी केला.

टाऊन हॉल येथे मेकर ग्रुप इंडिया विरोधी कृती समितीचा मेळावा दूपारी झाला.अध्यक्षस्थानी नाथाजीराव पवार होते. मेळाव्यात शाहूपुरी पोलिसात या कंपनीविरुद्ध तक्रार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

ठेवीवर भरमसाट व्याज, आलिशान गाड्यांची बक्षिसेमधून आणि ग्राहकांना भुलविणाऱ्या योजना आदी कंपनीकडून केले आहे. साधारणत : ५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोल्हापूर, सांगली, बेळगांव आदी भागातून महिला ठेवीदार मेळाव्याला आल्या होत्या. यावेळी नाथाजीराव पवार यांनी, फसवणूकीबाबतची माहिती सांगून मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी एकत्रित लढण्याचा निर्धार केला.

मेळाव्यास संजय सुतार, अभिनंदन धरणगुत्ती, संजय दुर्गे, स्मिता जाधव, आश्लेषा कोळी, पाकिजा शिकलगार, लक्ष्मी नलवडे, मंगल पाटील यांच्यासह ठेवीदार, एजंट उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapur: The maker group is a firm decision not to go back on phishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.