कोल्हापूर :मध्यरात्री फटाक्यांचे बार काढणाऱ्यांची गय नाही : डॉ. अभिनव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 04:40 PM2018-11-14T16:40:58+5:302018-11-14T16:42:39+5:30
मध्यरात्री वाढदिवसानिमित्त फटाक्यांचे बार काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांचे ‘बारा वाजविण्या’चा संकल्प पोलीस प्रशासनाने केला असून, नागरिकांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
कोल्हापूर : मध्यरात्री वाढदिवसानिमित्त फटाक्यांचे बार काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांचे ‘बारा वाजविण्या’चा संकल्प पोलीस प्रशासनाने केला असून, नागरिकांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
सण कोणताही असो, निवडणूक निकाल, लग्न यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ठरवून दिलेल्या रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत. या व्यतिरिक्त अन्य वेळेत कोणी फटाके फोडले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
दिवाळीमध्ये अशा चौघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाईचे खाते उघडले आहे. रात्री बारा वाजता रस्त्यावर, चौकात वाढदिवस साजरा करणे, फटाके उडवून इतरांची झोपमोड करणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्याला, १०० नंबरला किंवा कोणी दखल घेत नसेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.