Kolhapur: विफाच्या उपाध्यक्षपदी मालोजीराजे यांची निवड
By सचिन भोसले | Published: October 28, 2023 11:23 PM2023-10-28T23:23:56+5:302023-10-28T23:24:22+5:30
Kolhapur: वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशनच्या के.एस.ए. अध्यक्ष मालोजीराजे यांची चार वर्षांकरीता कार्यकारिणी सदस्य व उपाध्यक्षपदी सलग पाचव्यांदा शनिवारी निवड झाली.
कोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशनच्या के.एस.ए. अध्यक्ष मालोजीराजे यांची चार वर्षांकरीता कार्यकारिणी सदस्य व उपाध्यक्षपदी सलग पाचव्यांदा शनिवारी निवड झाली.
अन्य निवडीमध्ये प्रफुल्ल पटेल (अध्यक्ष), तर सुनिल धांडे, विश्वजित कदम, डाॅ. श्रीकांत शिंदे, हरिष वोरा (सर्व उपाध्यक्ष), किरण चौगुले (मानद सरचिटणीस), ए.सलिम परकोटे (खजानीस), खाजा अन्सारी, अहमद लालानी, सुशीलकुमार सुर्वे (सहायक खजानीस), तर सदस्यपदी रविंद्र दरेकर, दिपक दिक्षित, सुशील दिक्षित, आनंद कालोकर, धनराज मोरे, योगेश परदेशी, अजगर पटेल, मित्तेश पटेल, जग्गु सय्यद, रमेश शेळके, सिराज उलहक सैद, मनोज वाळवेकर, नामदेव वानखडे यांचा समावेश आहे. मालोजीराजे यांनी महाराष्ट्रातील फुटबाॅल क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरी विशेष नोंद घेत ऑल इंडिया फुटबाॅल फेडरेशनने कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून दुसऱ्यांदा निवड केली आहे. कोल्हापूरच्या फुटबाॅल क्षेत्रास आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूरच्या फुटबाॅलपटू, प्रशिक्षक, पंच आदी संबधितांना राज्य, राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या निवडीसाठी के.एस.ए. पेट्रन इन चिफ शाहू छत्रपती यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीकांत शिंदे इन आदित्य ठाकरे आऊट
महाराष्ट्राची फुटबाॅल क्षेत्रातील अधिकृत व एआयएफएफ ला सलग्न असलेली विफा या संघटनेत सदस्य व उपाध्यक्ष म्हणून मागील कार्यकारिणीत मुंबई फुटबाॅल संघटनेतर्फे आमदार आदित्य ठाकरे हे यापुर्वी नेतृत्व करीत होते. मात्र, त्यांना यंदा संधी मिळाली नाही. त्यांनी अर्जच भरलेला नसल्याची चर्चा आहे. तर ठाणे फुटबाॅल असोसिएशनकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या फुटबाॅल जगतात श्रीकांत शिंदे इन आदित्य ठाकरे आऊट अशी चर्चा सुरु झाली आहे.