खतविक्री अपहारप्रकरणी कोल्हापूरच्या एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:00+5:302020-12-28T04:13:00+5:30
शिरोळ : शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ शाखेत ३६ लाख ७२ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी अमर शंकरराव गुरव (५५, ...
शिरोळ : शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ शाखेत ३६ लाख ७२ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी अमर शंकरराव गुरव (५५, रा.रामानंदनगर कोल्हापूर) याला शिरोळ पोलीसांनी शनिवारी अटक केली. वर्षभरापासून गुरव हा फरारी होता. या गुन्ह्यातील आणखी तिघे संशयित फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी की, शिरोळ शाखेत खतविक्रीत अपहार झाल्याचे संघ व्यवस्थापनाच्या निर्दशनास आल्यानंतर पाच जणांच्या पथकाने चौकशी केल्यानंतर शाखाधिकारी गुरव याने कबुली दिली होती. परस्पर खत विकून रजिस्टरवर स्टॉक दाखवून २०१८ ते २०१९ या दरम्यान, अपहार झाल्याचा गुन्हा पोलिसांत नोंद झाला होता.याप्रकरणी गुरव याच्यासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्षभरापासून चौघेही फरारी आहेत. यातील गुरव याला शिरोळ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली.