कोल्हापूर : शून्य सावलीचा अनुभव अनेकांनी घेतला, ५२ सेकंदांपर्यंत सावली गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:47 AM2018-05-07T11:47:17+5:302018-05-07T11:47:17+5:30
सदैव आपल्याबरोबर साथ देणारी सावली रविवारी दुपारी १ वाजून २९ मिनिटे आणि ११ सेकंद ते १ वाजून ३० मिनिटे व ४ सेकंदापर्यंतच्या या कालावधीत सावलीने आपली साथ ५२ सेकंदांपर्यंत सोडली. हा खगोलशास्त्रीय अनुभव कोल्हापुरातील अनेकांनी झिरो शॅडो अर्थात शून्य सावलीच्या दिवशी घेतला.
कोल्हापूर : सदैव आपल्याबरोबर साथ देणारी सावली रविवारी दुपारी १ वाजून २९ मिनिटे आणि ११ सेकंद ते १ वाजून ३० मिनिटे व ४ सेकंदापर्यंतच्या या कालावधीत सावलीने आपली साथ ५२ सेकंदांपर्यंत सोडली. हा खगोलशास्त्रीय अनुभव कोल्हापुरातील अनेकांनी झिरो शॅडो अर्थात शून्य सावलीच्या दिवशी घेतला.
कोल्हापुरात शून्य सावलीचा अनुभव एका चिमुकलीनेही घेतला. (छाया : नसीर अत्तार)
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तौ सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो पण दोन टोकांच्या मधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायास मिळतो.
सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. हाच अनुभव रविवारी दुपारी १ वाजून २९ मिनिटे व ११ सेकंद ते १ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंदापर्यंत कोल्हापूरकरांना घेतला. या खगोलशास्त्रीय घटनेची सुरुवात कोल्हापूरातून झाली. यापुढे शून्य सावली सरकत पुढे महाराष्ट्रभर नागरिकांना अनुभवण्यास मिळणार आहे.
शून्य सावलीचे वेळापत्रक
७ मे - मिरज, १० मे - सातारा, अक्कलकोट (सोलापूर), ११ मे - वाई, महाबळेश्वर, १२ मे - बारामती , बार्शी, १३ - लातूर, १४ मे- अलिबाग, दौड, पुणे, १५ मे - मुंबई, १६ मे - कल्याण, ठाणे, नगर, नांदेड, १८ मे - पैठण, १९ मे- जालना, २० मे-औरंगाबाद, नाशिक, २१ मे - मनमाड, २२ मे - यवतमाळ, २३ मे - बुलडाणा, मालेगाव, २४ मे- अकोला, २५ मे -अमरावती, २६ मे - नागपूर, जळगाव, भुसावळ यांचा समावेश आहे.