कोल्हापूर : अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, कलाकार महासंघाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 06:01 PM2018-10-04T18:01:15+5:302018-10-04T18:08:03+5:30
पश्चिम महाराष्ट्रातील बँड, बेंजो व वाद्याचे साहित्य गणेशोत्सवामध्ये जप्त करून कलाकारांवर अन्याय केला गेला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कलाकार महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांची भेट घेऊन अन्याय दूर करण्याचा निर्णय कलाकार महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला.
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील बँड, बेंजो व वाद्याचे साहित्य गणेशोत्सवामध्ये जप्त करून कलाकारांवर अन्याय केला गेला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कलाकार महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांची भेट घेऊन अन्याय दूर करण्याचा निर्णय कलाकार महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. कसबा बावडा शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष अनिल मोरे होते.
या बैठकीत गणेशोत्सवात कलाकारांवर पोलिसांकडून केल्या गेलेल्या अन्यायाबाबत आढावा घेण्यात आला. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महासंघाच्या वतीने लवकरच मंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष जयवंत वायदंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिता पाटील, उपाध्यक्ष राम कुंभार, कोषाध्यक्ष उदय पोवार, संघटक विश्वास ढाले, रजनी गोरड, उमेश अवघडे, गिरीश कांबळे, विजय गावडे, सचिन गोसावी, वैशाली कांबळे, महेश कदम, सुधाकर पाटील, साताप्पा पाटील, आकाश सौंदडे, बाजीराव माने, नगद चौधरी, सुनील पाटील, आदी उपस्थित होते.
तानाजी साठे यांना मरणोत्तर कलारत्न पुरस्कार
या बैठकीत पापाची तिकटी येथे गेल्या वर्षी दुर्घटनेत बळी पडलेले हलगीवादक तानाजी साठे यांना मरणोत्तर ‘कलारत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.